शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधाचा ठराव

By admin | Published: November 21, 2015 2:43 AM

जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्यांच्या शिष्टमंडळाला वेळ देऊनही भेट नाकारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधाचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्षांचा अवमान : बदलीची मागणी, सभापती-सदस्यही संतप्तयवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्यांच्या शिष्टमंडळाला वेळ देऊनही भेट नाकारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधाचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला. यावेळी त्यांची बदली करण्याची मागणी करीत सदस्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. लोकप्रतिनिधींचा असा अवमान यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असेही यावेळी सदस्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना विशेष करून जिल्हा परिषद सदस्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही बांधकाम व अर्थ समितीच्या सभापतींना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले होते. त्यानंतर आता चक्क राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांनाही त्याचा अनुभव आला. शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. आरती फुपाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सभापती सुभाष ठोकळ, विमल चव्हाण, नरेंद्र ठाकरे, सदस्य राहुल ठाकरे, ययाती नाईक, देवानंद पवार, वसंत चंद्रे, संदीप हिंगमिरे, प्रभाकर उईके, भीमराव राठोड आदींचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेले होते. जिल्ह्यातील पीक पैसेवारीतील असमानतेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची वेळही घेण्यात आली होती. शुक्रवारी शिष्टमंडळ गेले तेव्हा जिल्हाधिकारी एका बैठकीत होते. तासभर प्रतीक्षा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविणे पाठविले तेव्हा पाचच जणांना कक्षात येता येईल, असे सांगितले. यामुळे शिष्टमंडळातील सदस्य संतप्त झाले. चर्चा करायची तर सर्वांसोबत अन्यथा नाही, असे म्हणत ही मंडळी जिल्हा परिषदेत परत आली. दरम्यान शुक्रवारी जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती आणि चुकीची काढण्यात आलेली पीक पैसेवारी या मुद्यावर विशेष सभा घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधाचा ठराव घेऊन त्यांची बदली करण्यात यावी तसा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. महसूल राज्यमंत्री जिल्ह्यातील असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना अशी वागणूक मिळते. यावर सर्वसभागृहानेच खेद व्यक्त केला. सभागृहात पीक आणेवारी कशी काढली जाते, याची विचारणा महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. महसूलचे उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी पीक पैसेवारी काढण्याची संपूर्ण प्रक्रियाच सभागृहात सांगितली. गावपातळीवर पीक पैसेवारी समिती असून तिचे पदसिद्ध अध्यक्ष मंडळ अधिकारी असतो. तलाठी सचिव तर कृषी सहायक, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील आणि इतर काही सदस्य मिळून दहा जणांची ही समिती पैसेवारी काढण्याचे काम करते. समितीच्या एकमतानेच पैसेवारी काढली जाते. १५ सप्टेंबरला नजरअंदाज, ३१ आॅक्टोबरला सुधारित आणि ३१ डिसेंबरला अंतिम पैसेवारी घेतली जाते. प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारची कोणत्याच गावात समिती कार्यरत नसून कोणालाही विश्वासात न घेता महसूल विभागाच्या यंत्रणेने पैसेवारी काढल्याचा आरोप सदस्यांनी केला. ही पैसेवारी काढण्यापूर्वी जिल्हा परिषदेने ग्रामसेवकाशी पाठपुरावा करावा, सरपंचांनाही सूचित करण्यात यावे, अशी सूचना सदस्यांनी केली. पैसेवारी काढण्यापूर्वी प्रत्येक मंडळानुसार तारखा जाहीर केल्या जाव्या. समितीच्या अध्यक्षाने रितसर नोटीस काढून सदस्यांना सूचना द्याव्या, असाही ठराव सभागृहात घेतला. झटाळा, लव्हाणा, जाम या प्रकल्पातून सिंचन होत नसताना सिंचन केले जात असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. यावर सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. तत्पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष व सर्व सभापतींनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या या वर्तणुकीचा निषेध नोंदविला. (कार्यालय प्रतिनिधी)