यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील हनुमान शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि गांधी भवनात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जेडीआयईटीचे प्रा.संजय गुल्हाने, प्रा. गणेश काकड, डॉ. राम तत्ववादी, प्रा. अतुल राऊत, प्रा. संजय आमले, प्रा. अतुल बोराडे, प्रा. जितेंद्र सातुरवार, प्रा.अमीन, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार, पद्मिनी कौशीक, प्रा. आशिष माहुरे, प्रा. सुजित गुल्हाने, प्रा. रणजित शेंडे, प्रा. विशाल राठोड, प्रा. धीरज शिरभाते, प्रा. मोनिका ढवळे, प्रा. कुंभलकर, प्रा. नितीन चव्हाण, विद्यार्थी प्रतीक शिरभाते, हिमांशू बोपचे आदींनी सहकार्य केले. हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळयेथील हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्यावतीने स्वातंंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष प्रताप पारसकर, सचिव विजयराव देशमुख, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके उपस्थित होते. महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. बकुळ या सुगंधी वृक्षाचे रोपण प्राचार्य डॉ.रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन प्रा. अजय कोलारकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. सुहास तिवळकर, प्रा. अभय भीष्म, प्रा. प्रेमेंद्र रामपूरकर, प्रा. सदानंद मेश्राम, प्रा. डॉ. वीरेंद्र तलरेजा, रवींद्र निमट, विजय वाघ, सुनील काळे, विनोद डगवार, धनराज बंबावले, राजू अलोणे, विकास चिंचोळकर उपस्थित होते.गांधी भवन, यवतमाळ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथील गांधी भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सुभाष यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून घनशाम अत्रे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जगदीश गोंडाणे, विनोद ठाकरे, विष्णू भोयर, गजानन चोरे, माधव चांदेकर, सचिन राय, सागर बांगरे, अतुल भुराणे यांनी सहकार्य केले.
जवाहरलाल दर्डा यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2015 12:19 AM