लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी रक्तदान शिबिर पार पडले. लॉकडाऊनचे नियम आणि सोशल डिस्टन्स पाळत झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी ११ वाजता शिबिराला सुरुवात झाली. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी आणि लोकमत परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला गेला.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वसंत घुईखेडकर, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, लालजी राऊत, लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, ‘जेडीआयईटी’चे प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्ववादी, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा, वायपीएसचे प्राचार्य डॉ. जेकब दास, बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य वीरेंद्र तलरेजा, आनंदराव गावंडे, अॅड. जयसिंग चव्हाण, विलास देशपांडे, सुभाष यादव, किशोर भोवते यांची प्रमुख उपस्थित होती.शिबिरात रक्त संकलनासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीच्या चमूचे सहकार्य लाभले. मेडिकलचे समाजसेवा अधीक्षक गणेश कानाडे, मोबीन हुंगे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तसंक्रमण अधिकारी श्रृतिका मडावी, तंत्रसहायक प्रतीक मोटे, जीवन टापरे आदींचा या चमूत सहभाग होता.शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड, प्रा. मिलिंद लाभशेटवार, प्रा. प्रगती पवार, प्रा. सागर जिरापुरे, प्रा. अनिल फेंडर, प्रा. समीर वानखेडे, प्रा. सुनील पातालबंसी, रासेयोचे विद्यार्थी गटप्रमुख गौरव सुरावार, प्रज्वल पत्रकार, राहुल वाघमारे, अनुप डोंगरे, यश चंदन आदींनी परिश्रम घेतले.बाबूजींना अभिवादन आणि वृक्षारोपणशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेपुढे दीप प्रज्वलित करुन अभिवादन करण्यात आले. शिवाय जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
बाबूजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:00 AM
लॉकडाऊनचे नियम आणि सोशल डिस्टन्स पाळत झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी ११ वाजता शिबिराला सुरुवात झाली. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी आणि लोकमत परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला गेला.
ठळक मुद्देतरुणांचा सहभाग : जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात उपक्रम