लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : येथील युवकांनी समाजातील वंचित वृद्धांची जबाबदारी स्वीकारून त्यांच्यासाठी तालुक्यातील दत्तापूर येथे माऊली वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली.दत्तापूर येथे नुकतेच माऊली वृद्धाश्रम तथा माऊली वृद्ध सहाय्यता केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून काही युवकांनी एकत्रित येऊन हे व्रत हाती घेतले. तालुक्यातील निराधार वृद्धांची जबाबदारी समाजाच्या मदतीने स्वीकारण्यासाठी ‘माऊली वृद्धाश्रमाची’ निर्मिती केली जाणार आहे. दत्तापूर येथील रामभाऊ बुर्रवार यांच्या शेतात वृद्धाश्रम उभा राहणार आहे.माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार राजू तोडसाम यांच्याहस्ते या भूमिपूजन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य आशिष लोणकर, पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे, तहसीलदार गजानन हामंद, ठाणेदार असलम खान, विनायक ठाकरे, जगदीश पंजाबी व किशोर दावडा, अंबादास राठोड, परेश कारिया, महेश पवार, शोभाताई ठाकरे, रणधीर आत्राम, आकाश जाधव, दत्ता गटलेवार आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आकाश बुर्रेवार, संतोष अक्कलवार, सुनील हूड, शाम नागरीकर, मुकेश चिव्हाणे, असिफ सय्यद, आकाश राठोड, अंकुश आत्राम, सुशील मेश्राम, प्रफुल लेंडगुरे, प्रदीप पिन्नमवार, विक्की ढवळे, राहुल मस्के, यश भोयर, सतीश सामृतवार, स्वानंद चव्हाण, अनिल बावणे आदींनी परिश्रम घेतले.
युवकांनी स्वीकारली वृद्धांची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:28 PM
येथील युवकांनी समाजातील वंचित वृद्धांची जबाबदारी स्वीकारून त्यांच्यासाठी तालुक्यातील दत्तापूर येथे माऊली वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली.
ठळक मुद्देमाऊली वृद्धाश्रम : घाटंजी तालुक्यातील दत्तापूर येथे वृद्ध सहाय्यता केंद्र उभारणार