घाटंजी : तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या वाघाडी नदीला लोकसहभागामुळे पुनर्जीवन मिळाले आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीपात्रातील गाळ, कचरा आणि वाढलेली झुडपं काढून टाकल्याने अरूंद झालेल्या या नदीचे पात्र आता १५० फूट झाले आहे. लोकसहभागातून ही किमया साधली गेली आहे.सामाजिक जाण असलेल्या शहरातील मंडळींनी वाघाडी नदी वाचवा अभियान सुरू केले. शहराच्या मध्यभागी नैसर्गिक डोह असलेल्या ठिकाणी साचलेला गाळ काढण्यात आला. ९०० फूट लांब, १०० फूट रूंद आणि सहा फूट खोल गाळ उपसण्यात आला. गाळ मिश्रीत माती नदी काठावर टाकण्यात आली. काठाची उंची २० फूट झाल्याने पुराचा धोकाही कमी झाला आहे. कित्येक वर्षांपासूनचा गाळ निघाल्याने नदीचे नैसर्गिक झरेही मोकळे झाले. याचा फायदा शहरातील नैसर्गिक जलस्रोतांना होत आहे. वाघाडी नदी खोलीकरण आणि स्वच्छतेची मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य घेतले जात आहे. अभियानासाठी संयोजक प्रशांत उगले, सुभाष मानकर, सत्यजित जेना, मधुकर धस, रणजित बोबडे, अॅड. संदीप नार्लावार, मनसूरभाई, अमित पडलवार, प्रदीप बावने, गिरीश बोरकर, लक्ष्मण कानकाटे, श्रीहरी पेंदोर, माधुरी ताजने, दिनेश हुदैकर, गणेश धांदे, सुरज हेमके, प्रमोद गिरी, ओम बाजपेयी, भावेश सूचक, अंकूश हर्षे, संतोष चिव्हाणे, नागोराव गिनगुले, गणेश खापर्डे, अनिल दावडा, विद्याधर राऊत, महादेव सोनटक्के, प्रवीण वानखडे, मनोज हामंद, विक्की माहुरे, अभिजित झाडे, किशोर अक्कलवार आदी पुढाकार घेत आहे. (प्रतिनिधी)
घाटंजीतील वाघाडी नदीला पुनर्जीवन
By admin | Published: August 28, 2016 12:18 AM