सोयाबीन वाया गेले : आणखी दोन दिवस ‘हाय अलर्ट‘यवतमाळ : गेल्या महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने दिलासा दिला. या पावसामुळे भारी जमिनीतील पीक तरले असले, तरी हलक्या जमिनीतील पीक पाण्याअभावी करपले आहे. महिनाभर पाऊस नसल्याने करपणाऱ्या पिकामुळे शेतकरी चिंतातूर झाले होते. पावसाअभावी जिल्ह्यात हलक्या जमिनीतील ४० हजार हेक्टरवरील पीक करपले. करपलेल्या पिकाचे सर्वेक्षण कृषी विभागाकडून सुरू आहे. अनेक तालुक्यात सोयाबिनचे एकही पान शिल्लक नाही. शेंगा भरण्यापूर्वीच त्या गळून पडल्या आहे. काही तालुक्यात सोयाबिनच्या पिकाला परतीच्या पावसाचा कोणताही लाभ होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जिल्ह्यात भारी जमिनीतील सोयाबीन पिकाची ताण सहन करण्याची क्षमता संपली होती. या पिकांनाही पावसाची नितांत आवशकता होती. परतीच्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे. कापूस पिकालाही पावसाची नितांत गरज होती. आता बरसलेल्या पावसाने कपाशीचे पीक सुधारण्यास मदत मिळाली आहे. या पावसामुळे कपाशीची पाती गळ आणि पांढऱ्या माशीचा प्रकोप कमी होईल. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ८६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. (शहर वार्ताहर)
परतीच्या पावसाने पिकांना जीवदान
By admin | Published: September 15, 2016 1:20 AM