लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा प्रशासनात महत्त्वाचे मानले जाणाऱ्या महसूल खात्याला सध्या रिक्त पदांनी पोखरले आहे. महिनोगणती रिक्त असलेल्या या जागा सत्ताधारी नेत्यांचे राजकीय अपयश मानले जाते. परंतु त्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे समर्थक एकमेकांकडे बोट दाखवित आहे.संजय राठोड यांच्याकडे महसूल राज्यमंत्री तर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री पद मदन येरावार यांच्याकडे आहे. त्यानंतरही जिल्ह्यात शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात अधिकारी-कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत. विशेषत: शासकीय यंत्रणेचा कणा समजल्या जाणाºया महसूल विभागातच सर्वाधिक जागा रिक्त आहेत. आजच्या घडीला जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ दोन उपजिल्हाधिकारी खिंड लढवित आहेत. जिल्हाधिकारी प्रशिक्षणासाठी गेले आहे. रिक्त पदांमुळे ऐन पाणीटंचाईत महसूल खात्याची गती मंदावली आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे. पीक कर्ज वाटप, बियाणे, खते, कीटकनाशकांची उपलब्धी, शेतमालाची विक्री, साठवणूक, चुकारे असे विविध प्रश्न आहेत. यावर शासकीय स्तरावर फारशी चर्चा होताना दिसत नाही. प्रशासकीय यंत्रणेत मरगळ आली आहे. यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांना जबाबदार धरले जात आहे.जनतेची रास्त अपेक्षामहसूल राज्यमंत्रीपद यवतमाळ जिल्ह्याकडे असल्याने किमान महसूल विभागात तरी अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकही जागा रिक्त असू नये, ही येथील जनतेची रास्त अपेक्षा आहे. परंतु प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात महसुलात पदे रिक्त आहे. काही अधिकाºयांच्या नियुक्त्या झाल्या. मात्र त्यांनी परस्परच आपले बदली आदेश फिरवून घेतले.उघडे पाडण्याची तर खेळी नाही?जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पूर्वी संजय राठोड यांच्याकडे होते. मात्र भाजपाने ते स्वत:कडे घेतले. तेव्हापासून हिरमोड झाल्याने राठोड यांचा जिल्ह्यात इन्टरेस्ट संपला. आता संपूर्ण जबाबदारी मदन येरावार यांची म्हणून ते दुर्लक्ष करीत असावे, असा अंदाज आहे. अधिकाधिक जागा रिक्त राहिल्यास पालकमंत्री पदाचे अपयश उघड होईल, असा तर शिवसेनेचा छुपा अजेंडा नाही ना असा शंकेचा सूर ऐकायला मिळतो आहे.सामान्य प्रशासनचा उपयोग काय?पालकमंत्रीपद मदन येरावार यांनी खेचून आणत आपले वजन दाखवून दिले. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन हे खाते आहे. त्यानंतरही जिल्ह्यात महसूलसह विविध खात्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असाव्या, हे पालकमंत्र्यांचे अपयश मानले जाते. ना. येरावारांकडील ऊर्जा खात्यातही अनेक पदे रिक्त आहेत. बदलीवर अधिकारी येण्यास तयार नाहीत. त्यातही सर्वाधिक वाईट अवस्था भूमिअभिलेख, अन्न व औषधी प्रशासन या खात्यांची आहे. ‘महसूल’चे अपयश दिसावे म्हणून भाजपाची तर त्यातील पदे रिक्त ठेवण्याची खेळी नसावी ना, असा सूरही ऐकायला मिळतो आहे.मंत्र्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत जनतेचे हालभाजपा, शिवसेना मंत्र्यांच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत जिल्ह्यातील जनता मात्र होरपळली जात आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळातही प्रशासकीय सपोर्ट मिळताना दिसत नाही. रिक्त पदे भरण्याबाबत जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर एकजुटीने दबाव वाढविल्याचे ऐकिवात नाही. विविध खात्यातील या रिक्त पदांचा विपरित परिणाम जिल्ह्यात सर्वदूर होत असून त्याचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.
महसूल खात्याला रिक्त पदांनी पोखरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 10:27 PM
जिल्हा प्रशासनात महत्त्वाचे मानले जाणाऱ्या महसूल खात्याला सध्या रिक्त पदांनी पोखरले आहे. महिनोगणती रिक्त असलेल्या या जागा सत्ताधारी नेत्यांचे राजकीय अपयश मानले जाते. परंतु त्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे समर्थक एकमेकांकडे बोट दाखवित आहे.
ठळक मुद्देअपयश कुणाचे ? : पालकमंत्र्यांचे की महसूल राज्यमंत्र्यांचे ?