यवतमाळ : जिल्ह्याच्या महसूल विभागात तीन उपविभागीय अधिकारी आणि दोन तहसीलदारांच्या बदल्यांचे संकेत मिळत आहेत. यवतमाळ एसडीओ विकास माने मराठवाड्याच्या वाटेवर आहेत. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर वणी एसडीओ संदीप अपार यांचा डोळा आहे. त्याचवेळी ‘गृह’जिल्ह्याचे दीर्घ अनुभवी ‘ओएसडी’सुद्धा येथे प्रयत्नरत आहेत. पुन्हा वणीत बसण्यास महसूल उपजिल्हाधिकारी शिवानंद मिश्रा ईच्छूक आहेत. मिश्रा यांची वणीवरून यवतमाळला बदली झाली. मात्र ते रुजू झाले नव्हते. त्यांनी पुन्हा वणीसाठी फिल्डींग लावली. दोन दिवसांपूर्वी अचानक ते यवतमाळला रुजू झाले. मात्र त्यांची वणीसाठीची फाईल ‘सीएमओ’कडे मंजुरीच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते. यवतमाळ तहसीलदार अनुप खांडे यांची अमरावतीत विकास प्रबोधिनीमध्ये विनंतीवरून बदली झाली. त्यांच्या जागेवर उमरखेडचे सचिन शेजाळ यांच्या नावाची चर्चा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांच्या फेरबदलाचे संकेत
By admin | Published: January 10, 2016 2:54 AM