शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:36 PM

दिव्यांगांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असला तरी जिद्द, सयंम आणि सहनशीलतेचे दर्शन दिव्यांग व्यक्तींमध्येच होते.

ठळक मुद्देसंजय राठोड : राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान

ऑनलाईन लोकमतदारव्हा : दिव्यांगांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असला तरी जिद्द, सयंम आणि सहनशीलतेचे दर्शन दिव्यांग व्यक्तींमध्येच होते. त्यामुळेच समाजात सुदृढ व्यक्तींप्रमाणेच दिव्यांगांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी येथे केले.दारव्हा नगरपरिषदेतर्फे संत गाडेगबाबा जयंतीनिमित्त राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आयोजित दिव्यांग मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष भाऊसाहेब इरवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील गटनेते श्रीधर मोहोड, तालुका प्रमुख तथा संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष मनोज सिंगी आदी उपस्थित होते.दारव्हा नगरपरिषदेने दिव्यांगांसाठी खर्च करावयाच्या तीन टक्के रकमेतून १६५ दिव्यांगांना प्रत्येकी चार हजार २०० रुपयांचे अर्थसहाय्य देऊन या व्यक्तींना स्वबळावर उभं राहण्याची संधी दिली, असे कौतुकोद्गार ना. राठोड यांनी काढले.नगराध्यक्ष भाऊसाहेब इरवे यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी १६५ दिव्यांग निधी व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. २० दिव्यांगांना ना. संजय राठोड आणि मान्यवरांच्या हस्ते धनादेशाद्वारे निधीचे वाटप करण्यात आले तर, उर्वरित व्यक्तींच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे निधी थेट जमा करण्यात आला.या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती उषा चव्हाण, उपसभापती पंडित राठोड, नगरपरिषद बांधकाम सभापती अरविंद निंबरते, पाणीपुरवठा सभापती दीपा सिंगी, शिक्षण सभापती जयश्री खरोडे, महिला व बालकल्याण उपसभापती वैशाली खाटिक, नगरसेवक प्रकाश दुधे, रवी तरटे, आरिफ काझी, बाशिद खान, पंचायत समिती सदस्य नामदेव जाधव, मुख्याधिकारी धीरज गोहाड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे प्रकल्प अधिकारी हरिष भिसे यांनी केले. संचालन रूचिरा कापसे यांनी तर, आभार प्रदर्शन रमेश राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर परिषदेचे कर्मचारी मीनाक्षी दुधे, जीवन सुर्यवंशी, रवी राऊत, सय्यद अफसर, गोपाल यादव आदिंनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड