अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशातील मातब्बर वकील आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री राम जेठमलानी यांच्या निधनाचे वृत्त धडकताच जिल्ह्याच्या विधी वर्तुळात काम करणारी प्रत्येक व्यक्ती गहिवरली. कारण अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या ज्येष्ठ विधिज्ञाने अगदी काही वर्षापूर्वीच यवतमाळसारख्या ठिकाणी येऊन ग्रामीण भागात विधीसेवा देणाऱ्यांचे कान तृप्त केले होते.निमित्त होते स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे. तो दिवस होता २४ नोव्हेंबर २०१३. येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात विधी व न्याय शास्त्र ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. व्याख्यानमालेचे पहिलेच पुष्प राम जेठमलानी यांच्या अनुभवसंपन्न वक्तृत्वाने गाजविले. ‘भारतीय घटनेंतर्गत धर्मनिरपेक्षता’ हा त्यांचा विषय होता.या व्याख्यानाच्या निमित्ताने जिल्हाभरातील न्यायाधीश, वकील, कायद्याचे अभ्यासक, महाविद्यालयीन विद्यार्थी या सर्वांना सुवर्णसंधी चालून आली होती. त्यामुळेच हे व्याख्यानही अविस्मरणीय ठरले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा होते. तर व्यासपीठावर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव अॅड. प्रकाश चोपडा, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा उपस्थित होते.प्रेरणास्थळी वृक्षारोपणविधी महाविद्यालयातील व्याख्यानापूर्वी अॅड. राम जेठमलानी यांनी प्रेरणास्थळावर येऊन स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना आदरांजली अर्पण केली. तसेच प्रेरणास्थळ परिसरात त्यांनी वृक्षारोपणही केले. याभेटीच्या निमित्ताने यवतमाळातील कायद्याच्या अभ्यासकांना अॅड. राम जेठमलानी यांचा अत्यंत जवळून सहवास लाभला त्या संदर्भात बोलताना अॅड. प्रवीण जानी म्हणाले, या व्याख्यानामुळे आम्हाला कधीही न संपणारी शिदोरी मिळाली. तर डॉ. विजेश मुणोत म्हणाले, कायद्यासारखा विषय असूनही अॅड. राम जेठमलानी यांनी सर्वांना कळेल अशा नर्मविनोदी पद्धतीने व्याख्यान दिले होते. हे व्याख्यान जिल्हावासीयांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.विजय दर्डा यांच्या हस्ते हृदयस्पर्शी स्वागतयावेळी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी गौरवपत्र प्रदान करून राम जेठमलानी यांचे यवतमाळकरांच्यावतीने हृदयस्पर्शी स्वागतही केले होते. त्यानंतर यवतमाळ बार असोसिएशनच्यावतीने अॅड.ए.पी. दर्डा, सिंधी समाजाच्यावतीने अॅड. जे.व्ही. वाधवाणी, अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.विजेश मुणोत यांनीही स्वागत केले.कार्ल मार्स्कने धर्माला अफुची गोळी संबोधले असले तरी भारतीय संविधान सभेने धर्माबाबत अतिशय चांगली तरतूद केली आहे. भारतीय संविधान आपल्याला धार्मिक सहिष्णुता शिकविते. धर्म प्रसारित करण्याची आपल्या संविधानात तरतूदही आहे. कुणी व्यक्ती आपल्या धर्म प्रसाराचे काम करीत असेल तर आपण त्याला खंजीर मारत नाही. त्याची गरजही नाही. कारण आपल्या संविधानाने युक्तीवाद करण्याची मुभा आपल्याला दिली आहे.- अॅड. राम जेठमलानी(यवतमाळ येथे २४ नोव्हेंबर २०१३ रोजी दिलेल्या व्याख्यानातील एक अंश)
राम जेठमलानींच्या स्मृतींनी गहिवरले जिल्ह्याचे विधी वर्तुळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:00 AM
निमित्त होते स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे. तो दिवस होता २४ नोव्हेंबर २०१३. येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात विधी व न्याय शास्त्र ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. व्याख्यानमालेचे पहिलेच पुष्प राम जेठमलानी यांच्या अनुभवसंपन्न वक्तृत्वाने गाजविले.
ठळक मुद्देपटवून दिले धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व : जवाहरलाल दर्डा स्मृतिदिनानिमित्त गाजले व्याख्यान