शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

मराठा आरक्षणासाठी यवतामाळमध्ये रस्ता रोको; उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय यंत्रणेचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

By रूपेश उत्तरवार | Published: September 05, 2023 12:39 PM

दुकानाची तोडफोड : चौकाचौकांत टायर जाळून निषेध         

यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी आज यवतमाळ शहरामध्ये बंद पाळण्यात आला. नागपूर तुळजापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान पोस्टल ग्राउंड लगतच्या  हल्दीराम शोरूममध्ये मोर्चेकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली. तसेच, विविध चौकांत टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला. एकूणच वातावरण तणावपूर्ण होते.

यवतमाळमध्ये मराठा आरक्षणासाठी बंद बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. १० नंतर वातावरण तापले. आंदोलनकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले. आंदोलकांनी, उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय यंत्रणेचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली होती. शहरातील नागपूर-तुळजापूर महामार्गावर वनवासी मारोती चौकात चक्काजाम आंदोलन करून टायर जाळण्यात आले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेने शहरात येणारी वाहतूक विस्कळीत झाली. सध्या शहरात तणावपूर्ण वातावरण असून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यापारपेठ सध्या बंद आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी समाज बांधवांकडून लढा सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनाेज जरांगे - पाटील यांनी उपाेषण सुरू केले आहे. लाेकशाही मार्गाने हे आंदाेलन सुरू असतानाच पाेलिसांकडून उपाेषणकर्त्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. राज्यभर मराठा समाजाकडून आंदोलन सुरू असतानाच यवतमाळजिल्ह्यातही मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे.

टॅग्स :agitationआंदोलनMaratha Reservationमराठा आरक्षणYavatmalयवतमाळjalna-acजालना