हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : संचारबंदीमुळे सर्व कामे ठप्प आहे. नागरिक घरात बंदीस्त आहे. या संचारबंदीचा सदुपयोग करून तालुक्यातील दोनवाडा येथील मनोहर महाजन या इसमाने टाकावू वस्तू गोळा करून त्यापासून रस्त्याची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे.कोरोनाच्या विळख्याने प्रत्येक नागरिक घरीच बसून आहे. ग्रामीण भागात भयावह अवस्था आहे. सर्वच कामे बंद आहे. मात्र दोनवाडा येथील मनोहर महाजन या युवकाने याच संधीचा लाभ उचलत अभिनव प्रयोग केला आहे. दोनवाडा हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. आडवळणावर व डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात शेती, शेतमजुरी हाच उद्योग आहे. हे गाव प्रशासनाच्यालेखी दुर्लक्षित आहे. मात्र गावकरी मोठ्या मनाचे आहे. आहे त्यात समाधान मानून त्यांची दिनचर्या सुरू असते.दोनवाडा परिसरात अवैध रेती वाहतुकीने रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. सर्वच रस्ते उखडलेले आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. यात कवठाबाजार ते आर्णी हा रस्ता अत्यंत दयनीय झाला आहे. याच मार्गाने रेती तस्करी केली जाते. कवठाबाजार येथून दोनवाडा येथे जाणारा रस्ताही दयनीय अवस्थेत आहे.रस्त्याची ही दैनावस्था लक्षात घेऊन संचारबंदीचा लाभ उचलत मनोहर महाजन यांनी टाकावू वस्तू गोळा करून त्यापासून रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे. त्यांनी रस्त्याच्याकडेला पडून असलेली खडी गोळा केली. कंत्राटदारांनी वापरुन फेकून दिलेल्या डांबराच्या टाक्या गोळा केल्या. त्याला तापवून त्यातूनच काही प्रमाणात डांबर काढले.गोळा केलेली खडी आणी डांबरातून त्यांनी आता रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली आहे. यातून रस्ता गुळगुळीत होणार नाही, याची मनोहर यांना जाणीव आहे. मात्र आपण रस्ता दुरुस्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याची त्यांची भावना आहे. हा रस्ता आपला असून त्याची देखभाल आणि दुरुस्ती आपण केली पाहिजे, हा विचार यातून त्यांनी नागरिकांसमोर ठेवला आहे.रस्ता हा गावाचा प्राणवायूदोनवाडा हे छोटेस गाव आहे. तेथील गावकऱ्यांसाठी हा रस्ता प्राणवायू आहे. रस्ता दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शासन दुरुस्ती करेल, तेव्हा करेल. मात्र तोपर्यंत हा रस्ता आपल्या गावाचा प्राणवायू समजून त्याची डागडुजी हाती घेतल्याचे मनोहर महाजन सांगतात. रस्त्यावरील खड्डे आपल्याला अस्वस्थ करीत होते. त्यामुळे शासनासोबतच आपलेही कर्तव्य समजून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
टाकावू वस्तूंपासून रोडची डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 5:00 AM
कोरोनाच्या विळख्याने प्रत्येक नागरिक घरीच बसून आहे. ग्रामीण भागात भयावह अवस्था आहे. सर्वच कामे बंद आहे. मात्र दोनवाडा येथील मनोहर महाजन या युवकाने याच संधीचा लाभ उचलत अभिनव प्रयोग केला आहे. दोनवाडा हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. आडवळणावर व डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात शेती, शेतमजुरी हाच उद्योग आहे. हे गाव प्रशासनाच्यालेखी दुर्लक्षित आहे.
ठळक मुद्देमनोहर महाजन यांचा प्रयोग, कोरोनाच्या संचारबंदीचा सदुपयोग