शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
5
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
6
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
7
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
8
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
9
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
10
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
11
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
12
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
13
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
14
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
15
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
16
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
17
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
18
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
19
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
20
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"

रोहयोच्या अपूर्ण विहिरी धडक सिंचनमध्ये पूर्ण करणार

By admin | Published: November 14, 2015 2:41 AM

जिल्ह्यातील धडक सिंचन योजनेअंतर्गत रखडलेल्या सात हजार विहिरी रोजगार हमी योजनेतून पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले.

२१० कोटींचा निधी : मुदतीत काम पूर्ण करण्याचे फर्मानयवतमाळ : जिल्ह्यातील धडक सिंचन योजनेअंतर्गत रखडलेल्या सात हजार विहिरी रोजगार हमी योजनेतून पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र त्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे या विहिरी रखडल्या. आता पुन्हा राज्य मंत्रीमंडळात धडक सिंचन मधल्या मंजूर विहिरी व रद्द झालेल्या विहिरी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. रोजगार हमी योजनेतून विहिरी खोदण्यासाठी शेतकऱ्यांना तीन लाखांचे अनुदान दिले जाते. मात्र ही रक्कम खर्च करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. रोहयोचे कार्डधारक मजूर कामावर लावावे लागतात. शिवाय अकुशल कामाचा मोबदलाही थेट काम करणाऱ्या व पुरवठादार एजन्सीच्या खात्यात जमा होतो. त्यामुुळे शेतकऱ्यांना पदरमोड करून विहिर खोदावी लागते. दुष्काळी स्थितीत ही बाब शक्य नाही. त्यामुळे यापूर्वी धडक सिंचन योजनेच्या वर्ग केलेल्या विहिरीसुद्धा रोहयोतून पूर्ण करता आल्या नाहीत. आता शासनाने सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी जुन्याच धडक सिंचन विहिर योजनेचा आधार घेतला जात आहे. या योजनेतून मंजूर होऊन वर्ग केलेल्या आणि काही कारणास्तव रद्द झालेल्या विहिरी पूर्ण करण्यात येणार आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, वर्धा व यवतमाळ या सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये धडक सिंचन विहिर योजना राबविण्याचे आतापर्यंत ३५ हजार ९८५ विहिरी पूर्ण झाल्या असून एक हजार ५३४ विहिरी अपूर्ण आहेत. तसेच या योजनेतील रद्द करण्यात आलेल्या विहिरींपैकी आठ हजार सातशे विहिरी धडक सिंचन योजनेअंतर्गत पुन्हा मंजूर केल्या जात आहेत. अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने दोनशे दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून ३० जून २०१६ पर्यंत विहिरी पूर्ण करावयाच्या आहेत. वरील सहा जिल्ह्यात धडक सिंचनमधील रोहयोत वर्ग केलेल्या एकूण १० हजार ३२० विहिरी आहेत. या कालावधीत पूर्ण न होऊ शकणाऱ्या विहिरी ३० एप्रिलपासून धडक सिंचन विहिर योजनेमध्ये वर्ग करून पूर्ण करण्यास आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)