शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
3
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
4
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
5
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
6
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
7
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
8
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
10
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
11
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
12
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
13
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
14
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
15
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
16
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
17
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
18
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
19
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
20
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI

विषय समित्यांसाठी रस्सीखेच

By admin | Published: January 12, 2017 12:47 AM

नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष विषय समिती व सभापतींच्या निवडीकडे लागले आहे.

पुसद नगरपरिषद : बांधकाम व पाणीपुरवठ्यासाठी कसरत पुसद : नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष विषय समिती व सभापतींच्या निवडीकडे लागले आहे. गुरूवारी नगरपरिषदेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता नगरसेवकांच्या विशेष सभेत सभापतींची निवड केली जाणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाळे राहतील. पुसद नगरपरिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, राष्ट्रवादी १२, काँग्रेस तीन, भाजपा १० व शिवसेना चार असे एकूण २९ नगरसेवक व नगराध्यक्ष अनिताताई नाईक असे एकूण ३० सभासद आहेत. गुरूवारी सर्व नगरसेवकांच्या विशेष सभेत पहिल्या सत्रात विषय समितीसाठी किमान आठ किंवा कमाल नऊ अशी सदस्य संख्या निश्चित करून गटनेत्यांकडून नावे सुचविण्यात येणार आहेत. पुसद नगरपरिषदेत बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, नियोजन, महिला व बाल कल्याण, शिक्षण अशा सहा समित्यांसाठी सभापतींची निवड होईल. बांधकाम व पाणीपुरवठा सारखे महत्वाचे सभापतीपद मिळावे यासाठी आघाडीमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. समिती सदस्यांची संख्या आठ ते नऊच्या दरम्यान राहणार आहे. आघाडी १५ तर युतीचे १४ नगरसेवक आहेत. स्थायी समितीवर जाण्यासाठीही काही जणांचे प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार मनोहरराव नाईक, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अकिल मेमन व काँग्रेसचे डॉ. मोहंमद नदीम, जकी अन्वर आदींची सभापती निवडीच्या पूर्वसंध्येला विशेष बैठक झाली. यामध्ये बरेच काही सिजल्याची चर्चा आहे. यामध्ये नेमक्या किती समित्या काँग्रेसच्या पदरात पडतात याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी) नागरिकांना आता विकासाची अपेक्षा पुसद शहरात नगर परिषद निवडणूक पार पडली. यामध्ये जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून द्यायचा होता, जनतेने अनिताताई नाईक यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना निवडून दिले. आता विषय समित्यांच्या निवडीमध्ये जनतेची एवढीच इच्छा आहे की, शहराचा प्रामाणिकपणे विकास करणाऱ्यांची निवड व्हावी. पाणीपुरवठा, आरोग्य, बालकल्याण आदी महत्वपूर्ण विभागात सध्या पुसद शहर चांगलेच माघारले आहे. या सर्व विषयांमध्ये वेगवान काम होणे काळाची गरज आहे. तेंव्हा अशाच तडफदार नगरसेवकांना सभापतीपद मिळावे, अशी पुसदकर जनतेची या निवडीमध्ये माफक अपेक्षा आहे.