पुसद : स्थानिक रोटरी क्लबच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पार पडला. यात नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून डॉ. जयानंद वाढवे तर सचिव म्हणून डॉ. विश्वास डांगे यांनी पदाची शपथ घेतली.
यावेळी एडीजे राजेश गढीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. आनंद झुनझुनवाला होते. डॉ. मीरा डांगे यांनी दीप गीत सादर केले. पाहुण्यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन डॉ. जयानंद वाढवे, डॉ. अनुप्रीता वाढवे, डॉ. विश्वास डांगे, डॉ. मीरा डांगे यांनी सत्कार केला. मावळते अध्यक्ष प्रा. डॉ. चंद्रप्रकाश खेडकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जयानंद वाढवे यांना रोटरी पिन, कॉलर व हॅमर देऊन अध्यक्षपदी विराजमान केले.
याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले. रोटरी क्लबच्यावतीने एक हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वृक्षांचे संगोपन करणाऱ्यांना वर्षाअखेर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. मावळते सचिव इंजिनिअर गजेंद्र निकम यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या कार्याची माहिती दिली. मावळते अध्यक्ष डॉ. चंद्रप्रकाश खेडकर यांनी कोरोना महामारीच्या काळात रोटरी सदस्य डॉक्टरांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. यावेळी नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टरची घोषणा करण्यात आली. पाहुण्यांचा परिचय सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर ठाकरे व डॉ. उमेश रेवनवार यांनी करून दिला. डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी रोटरी क्लबच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्याची माहिती दिली. संचालन ॲड. अशोक महामुने व स्वप्नील चिंतामणी यांनी केले. यशस्वीतेसाठी गिरीश बयास, डॉ. भानुप्रकाश कदम, डॉ. विरेन पापळकर, डॉ.राजेश अग्रवाल, डॉ. उत्तम खांबाळकर, डॉ. राजेश चव्हाण, डॉ. संजय अग्रवाल, ॲड. विवेक टेहरे, विजय ठाकरे, संजय तांबेकर, राम पद्मावार, शैलेश उबाळे, राम फुके, अमोल वर्मा, डॉ. तुषार पवार, डॉ. आनंद कोमावार, डॉ. सुजित चिलकर, डॉ. विहार बिडवाई, अविनाश देशमुख, डॉ. वैशाली निकम, मीना बयास, मीनाक्षी वाढवे, ताई चिंतामणी, ताई ठाकरे, डॉ. साधना खांदवे आदींनी पुढाकार घेतला.