यवतमाळ : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने यवतमाळातील महादेव मंदीर मार्गावर असलेल्या रिलायन्स मार्टमध्ये (मे.रिलायन्स रिटेल लिमीटेड) अचानक भेट देवुन तपासणी केली. यावेळी जाळे लागलेले आणि भुंग्यांनी पोकरलेले शेंगदाणे तसेच भुंगे असलेले काबुली चणे या ठिकाणी विक्रीसाठी ठेवले असल्याची गंभीर बाब उघडकीस आली. विक्रीसाठी ठेवण्यात आलेला हा साठा जप्त करण्यात आला. गुरूवार २० एप्रिल रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
रिलायन्स मार्ट स्टोअरमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी यांनी तपासणी केली. यावेळी विक्रीकरीता ठेवण्यात आलेले गुड लाईफ आणि प्रो नेचर या दोन ब्रँडचे पाकीटबंद शेंगदाणे पुर्णपणे खराब झालेले आढळुन आले. दोन्ही ब्रँन्डचे एक-एक पाकीट उघडुन पाहीले असता त्यामध्ये कुजलेले शेंगदाणे आणि कीटकाची जाळी जळमटे मोठ्या प्रमाणात आढळुन आली. तसेच कीटकांनी अर्धवट कुडतडलेल्या दाण्यांची संख्याही मोठी आढळुन आली. त्यामुळे प्रत्येक ब्रँन्डचे ४-४ पाकीट नमुण्या करीता घेण्यात येवुन उर्वरीत साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर स्टीलच्या कोठीमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेले खुले शेंगदाणे पाहीले असता त्यात मोठ्या प्रमाणात कीड्यांची जाळी लागलेली दिसुन आली. काही दाने कीड्यांनी कुडतडलेले आणि भुंगा लागलेले आढळले. त्यापैकी २ कीलो शेंगदाणे नमुण्याकरीता घेवुन उर्वरीत साठा जप्त करण्यात आला. त्याच्या शेजारी स्टीलच्या कोठीमध्ये विक्रीसाठी ठेवलेले काबुली चणे तपासले असता त्यात मोठ्या प्रमाणात भुंग्यांची छीद्रे असुन त्यात जीवंत कीडे फीरत असलेले आढळुन आले. त्यापैकी २ कीलो चणे नमुण्याकरीता घेवुन उर्वरीत साठा जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी जी. पी. दंदे व गोपाल माहोरे यांनी त्यांच्या पथकासह ही कारवाई केली. रिलायन्स मार्टसारख्या मोठ्या आस्थापणेवर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. अयोग्य अन्न पदार्थ विक्रीकरीता ठेवणाऱ्या आस्थापणा चालकांचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारची तपासणी मोहिम संपुर्ण जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अनपेक्षीत पणे राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले