लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाच्या कोषागारात महसुलाची भर टाकण्यात परिवहन विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०१८-१९ या आर्थिक वर्षात शासनाला घसघशीत महसूल गोळा करून दिला आहे. ८ कोटी ७१ लाख ४९ हजार रुपयांची गंगाजळी जमा केली.उपप्रादेशिक परिहवन कार्यालयाला आर्थिक वर्षासाठी दिलेल्या महसूल उद्दिष्टापैकी ९६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. यामध्ये रोड टॅक्स हा ५ कोटी इतका आहे. तर उर्वरित रक्कम ही वाहनधारकांवर केलेल्या विविधी कारवाईतून दंड स्वरूपात वसूल करण्यात आली. यामध्ये ३ कोटी १८ लाख ३५ हजार ७६४ रूपये आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकर यांच्या मार्गदर्शनात आरटीओंच्या भरारी पथकाने ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली. याशिवाय परिवहन नियमांची पायमल्ली करणाऱ्याविरोधात धडक मोहीम राबविण्यात आली. यातून दंड स्वरूपात मोठी रक्कम गोळा झाली. तसेच कर चोरी करणारे वाहनधारक, नवीन वाहनांवर आकारण्यात येणारा टॅक्स अशा विविध मार्गाने महसूल गोळा करण्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाला यश आले.आॅनलाईन टॅक्स भरणाग्रीन टॅक्समधून ९७ लाख ७७ हजार, रस्ते सुरक्षा निधीतून १ कोटी २१ लाख, वन टाईम टॅक्समधून चार कोटी ८८ लाख ९६ हजार रुपये गोळा झाले आहे. वाहनधारकांना आता आॅनलाईन टॅक्स भरता येत आहे. आॅनलाईन प्रणालीवरून पाच कोटी ५८ लाख ४७ हजार रुपये जमा झाले आहेत.
आरटीओने गोळा केला नऊ कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 9:36 PM
राज्य शासनाच्या कोषागारात महसुलाची भर टाकण्यात परिवहन विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०१८-१९ या आर्थिक वर्षात शासनाला घसघशीत महसूल गोळा करून दिला आहे. ८ कोटी ७१ लाख ४९ हजार रुपयांची गंगाजळी जमा केली.
ठळक मुद्देतीन कोटींचा दंड : वाहनधारकांवर धडक कारवाईचा परिणाम