शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

परिवहन आयुक्तांकडून आरटीओची झाडाझडती

By admin | Published: March 27, 2016 2:19 AM

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निष्क्रीयता खुद्द परिवहन मंत्र्यांनी अनुभवल्यानंतर शुक्रवारी परिवहन आयुक्तांनी जिल्ह्याचा दौरा केला.

महसूल घटला : पिंपळखुटी चेक पोस्टचीही तपासणी यवतमाळ : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निष्क्रीयता खुद्द परिवहन मंत्र्यांनी अनुभवल्यानंतर शुक्रवारी परिवहन आयुक्तांनी जिल्ह्याचा दौरा केला. कार्यालयात तब्बल चार तास ठिय्या देऊन प्रत्येक विभागाची पाहणी करीत झाडाझडती घेतली. एकंदर कामकाज आणि घटलेले महसुली उत्पन्न याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना जाब विचारला. इतकेच नव्हे तर पिंपळखुटी चेक पोस्टलाही भेट देऊन तेथील कामकाजाची तपासणी केली. परिवहनमंत्री दिवाकरराव रावते गत आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी अवैध प्रवासी वाहतुकीचे वास्तव स्वत: अनुभवले होते. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी शुक्रवारी येथील आरटीओ कार्यालयाला भेट दिली. आयुक्तांनी स्वत: कार्यालयाच्या सर्व विभागांची पाहणी केली. येथे अनेक ठिकाणी कागदांचे गठ्ठे अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. कर्मचाऱ्यांच्या टेबला जवळ पानाच्या पिचकाऱ्या दिसत होत्या. यावरून अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. कार्यालयाचे महसुली उत्पन्नाचे उद्दीष्ट घटले आहे. याबाबत उपविभागीय परिवहन अधिकाऱ्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक सहायक परिवहन अधिकारी यांना जाब विचारण्यात आला. वाहनांची नियमित तपासणी केली जात नसल्याचा ठपका खुद्द आयुक्तांनी ठेवला. यामुळेच उत्पन्न घटल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. कार्यालयात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, आयुक्त येणार असल्याने येथील खासगी कर्मचारी मात्र बेपत्ता होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा क्लास घेतल्यानंतर आयुक्तांनी आपला मोर्चा पिंपळखुटी चेक पोस्टकडे वळविला. येथील सीसीटीव्ही कॅमेराच्या रेंज बाहेर असलेली चौकी आयुक्तांच्या दौऱ्यावर नियोजित स्थळी आणली होती. येथे काम करणारे १०८ खासगी कर्मचारीही पद्धतशीरपणे गैरहजर होते. यावेळी वाहन तपासणीचे रेकॉर्ड आयुक्तांनी पाहिले. मात्र येथे वाहनधारकांना दिल्या जाणाऱ्या बोगस पावत्या पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आल्या. चेक पोस्टवर संगणकीकृत पावती देणे अपेक्षित आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास येऊच नये अशी व्यवस्था करून पांघरून घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी) सीसीटीव्हीपुढे अडथळा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात चालणारा भोंगळ कारभार सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये येऊ नये यासाठी येथील लिपिकवर्गीय यंत्रणेने पद्धतशीरपणे कॅमेराच्या समोरच कपाट लावून अडथळा निर्माण केला आहे. त्यांच्या बसण्याची जागा सोडून इतर सर्व भागाचे चित्रीकरण होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.