लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आधार कार्ड नसल्यास सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ नाकारला जाणार आहे. याचा फटका गरीब आणि गरजू कुटुंबाला बसणार आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणारी ही बाब आहे. सदर योजनेसाठी आधारची सक्ती केली जाऊ नये, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी जिल्हा महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अॅड. क्रांती राऊत (धोटे) यांनी नेतृत्त्व केले.कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी गरीब गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींसाठी सबला आणि अमृत आहार योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. मात्र या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. जगविण्यापेक्षा ओळखपत्राला अधिक महत्त्व देण्याच्या या भूमिकेमुळे अनेक बालक आणि महिलांना या मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे. विशेषत: बेघर, स्थलांतरित आणि रहिवासी पुरावा नसलेल्या कुटुंबांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. मुलभूत मानवी हक्काची पायमल्ली या सक्तीमुळे होत आहे. शिवाय पोषण आहाराचे सहा महिन्याची देयकेही महिला बचत गटांनी सरकारला दिलेली नाही. ही बाब गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कुपोषणाचा टक्का घटावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनाच याचा लाभ दिला जाणार आहे. यावर विचार व्हावा असे म्हटले आहे. निवेदन देताना वनमाला अवथळे, नीलिमा राऊत, माधुरी कदम, नयंती वैद्य, अश्विनी टेकाम, नंदिनी अवथळे, लीना तराळे आदींची यावेळी उपस्थिती होती.
‘सबला व अमृत’ला आधार नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:40 IST
आधार कार्ड नसल्यास सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ नाकारला जाणार आहे. याचा फटका गरीब आणि गरजू कुटुंबाला बसणार आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणारी ही बाब आहे.
‘सबला व अमृत’ला आधार नको
ठळक मुद्देसक्ती टाळा : राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन