लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : वनपरिक्षेत्रामध्ये सातत्याने सागवान वृक्षांची कत्तल सुरू आहे. म्हसोला फाट्यावर मातीच्या ढिगाऱ्यातून सागवान लाकडाचा बेवारस साठा बाहेर आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान कटाई होऊन वनविभागाची स्थानिक यंत्रणा कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही. महामार्गालगतच कटाई होऊन त्याकडे कुणाचेच लक्ष नाही.महामार्गाच्या विकास कामाआड सर्रास वृक्षतोड सुरू आहे. याचा लाभ सागवान तस्कर घेत आहे. नागपूर- तुळजापूर मार्गावर म्हसोला फाटा परिसरात सुमारे दोन घनमीटर आवैध सागवान पडून आहे. यापेक्षा अधिक माल येथून लंपास केल्याचे दिसून येते. कोणतीही परवानगी न घेता तोडलेले सागवान महामार्गाच्या बाजूला मातीच्या ढिगाºयात दडविण्यात आले होते. आता कामादरम्यान माती बाजूला पडताच सागवान लाकडाचा ढिगच बाहेर आला आहे. हॅमर नसलेले सागवान दिसून येते.या लाकडाबाबत वन विभागाच्या स्थानिक यंत्रणेवरच संशय व्यक्त केला जात आहे. लाखो रूपयांचे सागवान बेवारस असताना ते ताब्यात घेण्याची तसदी अद्याप वनविभागाने घेतली नाही. चोरट्यांनी सोडलेले सागवान किमान वन विभागाने डेपोत जमा करणे अपेक्षित होते. मात्र प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने कुणीच कारवाईसाठी पुढे येताना दिसत नाही. चोरट्यांनी कटाई केल्यानंतर सागवान झाडांची थूट खोदून पुरावा नष्ट केला गेला.तोडून ठेवलेले सागवान कुणाचे आहे याची माहिती नाही. सदर बाबीची चौकशी करण्यात येईल.- प्रशांत बहादुरे,वनपरिक्षेत्र अधिकारी, हिवरी
हिवरी वनपरिक्षेत्रात सागवान कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 10:04 PM
वनपरिक्षेत्रामध्ये सातत्याने सागवान वृक्षांची कत्तल सुरू आहे. म्हसोला फाट्यावर मातीच्या ढिगाऱ्यातून सागवान लाकडाचा बेवारस साठा बाहेर आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान कटाई होऊन वनविभागाची स्थानिक यंत्रणा कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही.
ठळक मुद्देमातीत गाडला मुद्देमाल : वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नुकसान