उत्स्फूर्त सहभाग : सदनाच्या कर्णधारांनी पार पाडली परीक्षणाची जबाबदारी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सलाद सजावट, तर आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी फुल सजावट स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पोषक आहारासंबंधी जागरूकता यावी यासाठी सलाद सजावट, तर पर्यावरणाचे महत्त्व कळावे यासाठी फुल सजावट स्पर्धा घेण्यात आली. चारही सदनामध्ये ही स्पर्धा पार पडली. सलाद सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक चेतक सदनाच्या आर्या टोटे, देविका कोलवडकर व अनुजा तिवसकर यांनी पटकाविला. गजराज सदनाच्या मृदुला पांडे, सलोनी युसोकार, सान्या सोधी यांनी द्वितीय स्थान प्राप्त केले. तृतीय क्रमांक पुष्पक सदनातील सिद्धी आंबेकर, स्वरा वाढवे आणि लॉविना कोटवानी यांना मिळाला. फुल सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक गजराज सदनाच्या साची भुसे, तनुश्री येल्टीवार व श्रावणी पांडे यांनी मिळविला. चेतक सदनाची निधी जाधव हिने द्वितीय, तर तृतीय क्रमांक चेतन सदनाचे आलाप कासलीकर, अश्मित चोखानी व देवर्षी येंडे यांनी प्राप्त केला. परिक्षक म्हणून चेतक संघाचा कर्णधार मोहम्मद बॉम्बेवाला, गजराज सदनाचा प्रणव हिंडोचा, पुष्पक सदनाचा हर्ष खसाळे, विक्रांत सदनाचा कर्णधार यश परळीकर यांनी काम पाहिले. कुठल्याही स्पर्धेचे परीक्षण कशा प्रकारे केले जाते, याविषयी माहिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनाच परिक्षक म्हणून नेमण्यात आले होते. समन्वयक रूक्साना बॉम्बेवाला यांनीही परिक्षण केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सीसीए प्रमुख अमोल चन्नूरवार, कला शिक्षक अभिजित भिष्म यांचे योगदान राहिले. शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी आयोजकांचे कौतुक केले.
‘वायपीएस’मध्ये सलाद व फुले सजावट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:52 AM