शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

पांढरकवडा तालुक्यात भेसळयुक्त मिष्ठान्नाची विक्री

By admin | Published: January 06, 2016 3:26 AM

तालुक्यात भेसळयुक्त मिष्ठान्नाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. ...

पांढरकवडा : तालुक्यात भेसळयुक्त मिष्ठान्नाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. गेल्या आठ ते १० वर्षांपासून व्यावसायिकांनी पांढरकवडा शहरासह अनेक गावांमध्ये स्वीट मार्ट या नावाखाली मिष्ठान्न विक्रीची अनेक दुकाने थाटली आहे. सुरूवातीला मिष्ठान्न तयार करताना त्यामध्ये दर्जेदार पदार्थ वापरले जात होते. कोणत्याही प्रकारचे भेसळ त्यामध्ये केले जात नव्हते. छोट्या-छोट्या दुकानांमध्ये चालत असलेला हा व्यवसाय कालांतराने मोठ्या दुकानांमध्ये स्थानांतरीत झाला. लाखो रूपयांची पगडी देऊन भाडे तत्त्वावर व्यावसायीकांनी ही दुकाने थाटली.गेल्या काही वर्षात त्यांनी या व्यवसायात चांगलाच जम बसविला. तालुक्यात गोधन नामशेष होण्याच्या मार्गावर असताना व नागरिकांना दुधाची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असताना मिष्ठान्न बनविण्यासाठी नियमितपणे लागणारे शेकडो लीटर दूध कोठून आणले जाते, याची साधी चौकशीही केली जात नाही. संबंधित प्रतिनिधीने याबाबत चौकशी केली असता, मिष्ठान्नाच्या अनेक प्रकारामध्ये भेसळयुक्त दूध व रसायनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. काही बोटावर मोजण्याइतकीच मिठाईची दुकाने सोडल्यास मिष्ठान्न तयार करताना बहुतांश स्वीट मार्टमध्ये हीच पद्धत वापरली जाते. अन्न व औषधी प्रशासनाचे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. मिष्ठान्न कोणकोणत्या पदार्थांपासून तयार करण्यात येते, हे मिष्ठान्न किती दिवसापर्यंत विकायचे, ते खाण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, याची चौकशी करून खातरजमा करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागाची आहे. मात्र आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही स्वीट मार्टमधील मिष्ठान्नाची साधी चौकशीही करण्यात आली नाही. (तालुका प्रतिनिधी)