लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : गुटखा, मावा आदी तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर शासनाने कायद्यानुसार बंदी आणली असली तरी गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आदींची विक्री पांढरकवडा परिसरात लाखो रूपयांच्या घरात पोहोचली आहे. एकट्या पांढरकवडा तालुक्यात दररोज दोन लाख गुटखा पुड्यांची विक्री होत आहे.जिल्ह्यातील पुसद, वणी, उमरखेड, दारव्हा या बाजारपेठानंतर पांढरकवडाची बाजारपेठ मोठी आहे. शहराची लोकसंख्या ४० हजारांवर असून तालुक्यात १४१ गावे आहेत. संपूर्ण तालुक्यातील गावांची लोकसंख्या दीड लाखांवर आहे. दररोजची गुटखा पुड्याची विक्री दोन लाख एवढी आहे. किशोरवस्थेपासून तर प्रौढ व्यक्तीपर्यंत या गुटख्याचे सेवन करणारी मंडळी दिसून येते. यामध्ये उच्च शिक्षण प्राप्त केलेले तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांची संख्या प्रचंड प्रमाणात असून बहुसंख्य पानठेल्यांवर गुटख्याची विक्री केल्या जाते.तालुक्यात ७०० ते ८०० पानठेले असून या पानठेल्यापासून व दुकानावरून सर्रास या गुटखा पुड्याची विक्री केल्या जाते. काही गुटखा बहाद्दरांना दिवसागणिक १० ते १२ गुटखा पुड्या हव्या असतात. तंबाखूमिश्रीत पान चघळणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गुटखा, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांमुळे रक्तदाब, हृदयरोग, तोंडात फोड येणे, तोंडाचा कर्करोग तसेच क्षयरोग आदी रोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थ चघळणे हेच असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. तंबाखूचा वापर करणाºया शौकीनांमध्ये किशोरावस्थेत मुलांची संख्या मोठी आहे. ५० टक्के नागरिक आपल्या युवावस्थेपासूनच त्याचे सेवन करित आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी आणली आहे. यासाठी कायदाही केला आहे. परंतु या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नाही. परिणामी अनेक पानठेला, किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणात खुलेआमपणे गुटखा पुड्या विकल्या जात आहेत. शहराच्या तसेच ग्रामीण भागातील अनेक पानठेल्यावरून गुटखा पुड्याची विक्री होत असतानाही याकडे कुणाचेही लक्ष नाही. गुटखा सहज मिळत असल्यामुळे दिवसेंदिवस गुटख्याचा प्रसार तालुक्यात होताना दिसते.शासनातर्फे जनजागृतीची गरजतरूण पिढी तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी जाऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे. शासनाकडूनही आवश्यक त्या पातळीवर जनजागृती केली जात नसल्याने व्यसनाचे प्रमाण वाढत आहे.
पांढरकवडा शहरात दररोज दोन लाखांवर गुटखा पुड्यांची विक्रीकॅन्सरचे प्रमाण वाढले ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 5:00 AM
जिल्ह्यातील पुसद, वणी, उमरखेड, दारव्हा या बाजारपेठानंतर पांढरकवडाची बाजारपेठ मोठी आहे. शहराची लोकसंख्या ४० हजारांवर असून तालुक्यात १४१ गावे आहेत. संपूर्ण तालुक्यातील गावांची लोकसंख्या दीड लाखांवर आहे. दररोजची गुटखा पुड्याची विक्री दोन लाख एवढी आहे.
ठळक मुद्देपानठेल्याची संख्या अधिक, छुप्या मार्गाने होतोयं पुरवठा नरेश मानकर ।