लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. त्याचा परिणाम थेट पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर झाला आहे. गत १५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे ३.४८ रुपयांनी वाढले आहे. यामुळे पेट्रोलपंपावरील इंधनाची उचल २० टक्के घटली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि इराणमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरता निर्माण झाली. याचा परिणाम थेट बाजारपेठेवर होत आहे. यामुळे गत १५ दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज वाढत आहे. त्याचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर पडला आहे. वाढते दर ग्राहकांना परवडणारे नाही. यामुळे ग्राहकांनी पेट्रोलपंपावरून मोजकेच पेट्रोल खरेदी करणे पसंत केले आहे.याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेलच्या उलाढालीवर झाला आहे. दर दिवसाला ५००० लिटर डिझेलची उचल कमी झाली आहे. २ हजार ५०० लिटर पेट्रोलची उचल कमी झाली आहे. दरामधील वाढ अशीच कायम राहिल्यास येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलची उचल आणखी कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे. शासकीय वाहन, दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने, प्रवासी वाहने, रुग्णवाहिकांमध्ये पेट्रोलचा वापर होतो. प्रत्येक ग्राहक इंधनाची काटकसर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे.खासगी वाहनांचे दर वाढलेराज्य परिवहन महामंडळाने तिकिटाचे दर वाढविल्यानंतर खासगी वाहन दर वाढवितात. मात्र सततच्या दरवाढीने खासगी वाहनांनी तिकिट दर वाढविले आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.केंद्र, राज्याच्या निर्णयानंतरच दरवाढ थांबेलनिवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून कर्नाटक निवडणुकीत १ ते १३ मे असे १३ दिवस दर स्थिर ठेवण्यात आले. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या. आता ही दरवाढ रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाला ठोस निर्णय घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच दरवाढ रोखणे शक्य होणार आहे.महागाईत पडणार भरफळ, भाज्या आणि दुधाची वाहतूक वाहनाच्या मदतीने होते. यामुळे येणाºया काळात वाहतुकीत भाडेवाढ अटळ आहे. यातून फळ आणि भाज्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.एसटीच्या तिकीट दरात वाढीचे संकेतपेट्रोल आणि डिझेलच्या किमती सतत वाढत असल्याने राज्य परिवहन महामंडळाला दररोज नुकसानीचा सामना करावा लागत आहे. पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने एसटीचा तोटा वाढणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दरवाढीचे संकेत दिले आहेत. यामुळे एसटीची भाडेवाढ अटळ आहे.
पेट्रोल, डिझेलची विक्री २० टक्क्यांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:29 AM
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. त्याचा परिणाम थेट पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर झाला आहे. गत १५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे ३.४८ रुपयांनी वाढले आहे. यामुळे पेट्रोलपंपावरील इंधनाची उचल २० टक्के घटली आहे.
ठळक मुद्देपेट्रोलपंप अडचणीत : १५ दिवसांत ३.४८ रुपयांची दरवाढ