लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील भीम टायगर सेना आणि तीन पुतळा उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरात शहीद झालेल्या भीम वीरांना येथे मानवंदना देण्यात आली.यावेळी भीम टागयर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, तीन पुतळा उत्सव समितीचे आकाश सावळे, गणेश लोखंडे, गुलाब शिंदे, पंचायत समिती सदस्य देवेंद्र खडसे, बाबाराव उबाळे, अंबादास कांबळे, भाऊ उंदरे, आर.पी.गवई, सुरेश कांबळे, भाऊ सरकटे उपस्थित होते. याप्रसंगी आर.पी. गवई यांनी नामविस्तार आंदोलनाची माहिती देऊन आंबेडकरी चळवळ आणि धम्म तत्वज्ञानाबद्दल आपले उत्तरदायित्व काय आहे यावर मार्गदर्शन केले.संचालन प्रफुल्ल भालेराव यांनी आभार किशोर कांबळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर मघाडे, राजेंद्र कांबळे, आनंद खडसे, आकाश कांबळे, स्वप्नील कांबळे, निखिल कांबळे, आकाश धुळे, अविनाश बावणे, हेमंत अंभोरे, आतीष वाढवे, गणेश मोरे, कैलास बावणे, गौतम वाघमारे, रमेश मघाडे, शिवाजी थोरात यांनी परिश्रम घेतले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामांतर लढ्यातील शहिदांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:42 PM
येथील भीम टायगर सेना आणि तीन पुतळा उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरात शहीद झालेल्या भीम वीरांना येथे मानवंदना देण्यात आली.
ठळक मुद्देभीम टायगर सेना : पुसद येथील कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती