शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

व्यावसायिक स्पर्धेतून रेती कंत्राटदाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:06 PM

शहरातील खुनाची मालिका सरत्या वर्षातही कायम राहिली. शनिवारी रात्री ९ वाजता रेती कंत्राटदाराचा चांदोरेनगरातील घराजवळच तलवारीने वार करून खून करण्यात आला. हा खून व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे.

ठळक मुद्देचांदोरेनगरातील घटना : पत्नीची पाच आरोपींविरोधात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील खुनाची मालिका सरत्या वर्षातही कायम राहिली. शनिवारी रात्री ९ वाजता रेती कंत्राटदाराचा चांदोरेनगरातील घराजवळच तलवारीने वार करून खून करण्यात आला. हा खून व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. त्यावरून पोलिसांनी रात्रीच तिघांना ताब्यात घेतले.सचिन किसनराव मांगुळकर (३६) असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री सचिन मोहा फाट्यावर पानीपुरी खावून चांदोरेनगरातील घराकडे आला. घराच्या बाजूला काही अंतरावरच त्याच्यावर पाच ते दहा जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात सचिनचा गळा चिरण्यात आला. त्याच्या संपूर्ण शरीरावर लहान-मोठ्या २४ जखमा आहेत. अतिशय क्रुरपणे त्याला मारण्यात आले. काही कळायच्या आतच मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात सचिन घरासमोरच निपचित पडला होता. त्याची अवस्था पाहून कुटुंबियांचा थरकाप उडाला. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत सचिनचा मृतदेह तिथेच पडून होता.क्षणार्धात काय झाले हे न समजण्यापलिकडचे होते. मांगुळकर कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले. याही परिस्थितीत पोलिसांनी धीर देत सचिनचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सचिनची पत्नी अंजली मांगुळकर हिने दिलेल्या तक्रारीवरून कधीकाळचे सचिनचे व्यावसायिक भागीदार किरण खडसे, सचिन महल्ले दोघे रा. विठ्ठलवाडी, बाबू तायडे रा. गौतमनगर, भीमा खाडे, गजानन रामकृष्ण कुमरे यांच्याविरोधात कट रचून सचिनचा खून केल्याचा गुन्हा शहर पोलिसांनी पहाटे ३ वाजता दाखल केला. यानंतर पोलिसांनी पहाटेच धरपकड मोहीम सुरू केली. सचिन महल्ले, किरण खडसे व बाबू तायडे यांच्यासह आणखी काही संशयितांना ताब्यात घेतले. घटनेतील प्रमुख आरोपी भीमा खाडे व गजानन कुमरे दोघे पसार आहेत.सचिन हा बाभूळगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या रेती घाटावरून वाळू उपसा करण्याचे काम करीत होता. त्याच्यावर यापूर्वीसुद्धा दोन वेळा प्राणघातक हल्ला झाला. अक्षय राठोड विरोधात त्याने दीड वर्षापूर्वी खंडणीसाठी अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार दिली होती. या घटनेनंतर अक्षय राठोड टोळीला पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्या विरोधात मोक्काची कारवाई केली. विशेष म्हणजे अक्षय राठोडविरोधातील मोक्काचा प्रस्ताव पोलिसांनी शुक्रवारीच वरिष्ठांकडे सादर केला आणि त्यानंतर काही तासातच सचिनच्या खुनाची घटना झाली. या गुन्ह्यातील पसार आरोपींचा शोध उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. विविध पथके गठित करण्यात आली आहे. ताब्यातील आरोपींकडून गुन्ह्यासंदर्भातील माहिती व त्याची लिंक जोडण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे.कॉल डिटेल्सवर तपासाची दिशासचिन मांगुळकर याच्या मोबाईलवर आलेला कॉल आणि त्याने केलेले कॉल यावर तपासाची दिशा निश्चित केली आहे. घटनेपूर्वी सचिनला कॉल करणाऱ्यांचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. प्रथमदर्शनी हा खून व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचे दिसत असले तरी एकंदरच सचिनची व्यावसायिक पार्श्वभूमी बघता या मागेही इतर काही कारणे असू शकतात, याचा शोध पोलीस घेत आहे.गजाननवर दुसऱ्या खुनाचा आरोपपरिसरात सनकी म्हणून ओळख असलेल्या गजानन कुमरे याला वर्षभरापूर्वी पिंपळगाव परिसरात एका मनोरुग्ण भिकाऱ्याचा दगड घालून खून केल्याच्या आरोपात अटक झाली होती. गजाननला कुणी शिवीगाळ केलेली खपत नव्हती. यातूनच त्याने सचिनवर हल्ला केल्याचा संशय वर्तविला जात आहे.

टॅग्स :Murderखून