लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील पैनगंगेच्या खोऱ्यातील उत्कृष्ट दर्जाच्या रेतीची तस्करांनी वारेमाप उपसा सुरू केला आहे. रोज शेकडो ट्रॅक्टर व ट्रकांद्वारे रेतीची अवैध वाहतूक होत आहे. हा सर्व प्रकार तालुक्यातील प्रशासनाला माहित असूनही ‘आपण सर्व भाऊ -भाऊ, रेतीचा पैसा वाटून खाऊ’ या स्वार्थातून रेती तस्करीचे सर्व कार्य सुरळीत सुरु आहे.ज्या विभागाला रेती तस्करीवर नियंत्रण ठेवायचे आहे, तो महसूल विभाग कोरोनाचे निमित्त पुढे करून या रेती तस्करीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत रेती घाटांचे लिलाव न झाल्याने याचा फायदाही तस्करांनी चांगलाच उचलला आहे. तालुक्यातील जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या पैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमधून राजरोसपणे रेतीची तस्करी केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे रेती तस्करांनी बंदी असूनही शेकडो ब्रास रेतीचा उपसा करुन नदी काठावरील शेतशिवारात, जंगलात व अन्य ठिकाणी साठा करून ठेवली आहे. याच डम्पिंग केलेल्या रेतीवर कधीकधीच महसूल प्रशासनाची नजर जाते. जप्त केलेल्या रेतीचीही त्याच कंत्राटदाराला विक्री करण्याचा अफलातून प्रकारही घडला आहे. तालुक्यातील रेतीघाट परिसर इको सेन्सेटीव झोन असून वाळू माफीया येथेच अधिक सक्रीय आहेत. याच भागातून मोठ्या प्रमाणात पांढरकवडासह अन्य तालुक्यातील रेतीचा पुरवठा होत असतो.याशिवाय छोट्या-मोठ्या नदी-नाल्यातून रेतीची तस्करी सुरू आहे. बंदी असतानाही रेतीची डम्पींग झालीच कशी, असा प्रश्न उपस्थित करून यासाठी महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाविना हा प्रकार घडला कसा, असा प्रश्न विचारला जात आहे.
पांढरकवडात लॉकडाऊनमध्ये रेतीची तस्करी जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 5:00 AM
ज्या विभागाला रेती तस्करीवर नियंत्रण ठेवायचे आहे, तो महसूल विभाग कोरोनाचे निमित्त पुढे करून या रेती तस्करीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत रेती घाटांचे लिलाव न झाल्याने याचा फायदाही तस्करांनी चांगलाच उचलला आहे. तालुक्यातील जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या पैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमधून राजरोसपणे रेतीची तस्करी केली जात आहे.
ठळक मुद्देमहसूल प्रशासनाचे दुर्लक्ष । रेती साठविण्यासाठी तस्करांमध्ये लागली स्पर्धा, शेतशिवारात केले रेतीचे साठे