गावाच्या राजकारणात कधीही न घडलेला इतिहास घडवून सरपंचपदी प्रिया अमोल वारंगे, तर उपसरपंचपदी अमोल पंडितराव वारंगे हे दाम्पत्य आरुढ झाले. त्यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड होताच त्यांनी सहकारी सदस्य सिद्धार्थ रामटेके, योगेश पाटील, शिवानंद पारधी, विष्णू पवार आदींच्या सहकार्याने गावात विकास कामे सुरू केली. प्रथम ग्रामपंचायतीमध्ये गावकऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था केली. नाल्यांची साफसफाई, गावातील घनकचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी परिसराची स्वच्छता, बंद पडलेली विहिरीवरील मोटार दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत केला.
आता गावात कोरोनाविषयी जनजागृती करून गावात फवारणी सुरू केली. त्यामुळे गावात सरपंच, उपसरपंच, सदस्यांचे कौतुक होत आहे. यापुढे गावात विकास कामे राबवून गावाचा कायापालट करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. गावात संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, विधवा निराधार, महिला सक्षमीकरण कार्यशाळा यासारख्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपड सुरू आहे. कृषी विभागाच्या योजनेचा लाभ सामान्य शेतकऱ्याला देण्यासाठी नियोजन केले जात आहे. प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रातील कार्यरत कर्मचाऱ्यांना समज देऊन आरोग्य सेवा सुरळीत करण्यात आली आहे. सरपंच प्रिया वारंगे, उपसरपंच अमोल वारंगे, सदस्य सिद्धार्थ रामटेके, योगेश पाटील, शिवानंद पारधी, विष्णू पवार गाव विकासासाठी प्रयत्न आहे.