शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

'पोस्टल'मध्येही संजय देशमुखांना मताधिक्य; १३ उमेदवारांपेक्षा 'नोटा' सरस

By दिनेश पठाडे | Published: June 05, 2024 5:46 PM

Yavatmal - Washim Lok Sabha Results 2024 : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ५२८० पोस्टल मते

वाशिम :यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे संजय देशमुख यांनी बाजी मारली. ईव्हीएम मतदानामध्ये त्यांनी मताधिक्य घेतलेच;परंतु पोस्टल मतदानामध्ये देखील तेच आघाडीवर राहिली.

लोकसभा मतदारसंघात १२ लाख २५ हजार ५३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये १२ लाख २० हजार २५० मते ईव्हीएम व ५ हजार २८० मते पोस्टलची होती. पोस्टल मतदान करणाऱ्यांमध्ये दिव्यांग आणि ८५ वर्षे वय झालेले वयोवृद्ध ज्यांनी घरुन मतदानासाठी नोंदणी केली तसेच कर्मचाऱ्यांचा समावेश होता. संजय देशमुख यांनी एकूण ५ लाख ९४ हजार ८०७ मते घेऊन विजय मिळवला. त्यापैकी ५ लाख ९१ हजार ८९९ ईव्हीएम आणि २ हजार ९०८ पोस्टल मताचा समावेश आहे. दुसरीकडे पराभूत उमेदवार राजश्री पाटील यांना एकूण ५ लाख ३३४ मते मिळाली. त्यामध्ये ४ लाख ९८ हजार ९९ मते ही ईव्हीएम व १ हजार ८२० मते  पोस्टलच्या माध्यमातून पडलेली आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील  पराभूत उमेदवारापेक्षा संजय देशमुख यांना पोस्टलची १ हजार ८८ मते अधिक पडली. त्यावरुन दिव्यांग, वयोवृद्ध आणि कर्मचाऱ्यांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पसंती दिल्याचे दिसते. 

१३ उमेदवारांपेक्षा नोटाला पोस्टलमध्ये अधिक मतेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात एकूण १७ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत ५ हजार २८० पोस्टल मतदान झाले होते. मोजणीअंती कोणत्या-उमेदवाराला किती पोस्टलचे मतदान झाले हे समोर आले असून उद्धवसेनेचे संजय देशमुख २९०८ मते घेऊन आघाडीवर आहेत. शिंदेसेनच्या राजश्री पाटील यांना १८२० पोस्टल मते पडली. समनक जनता पार्टीचे अनिल राठोड २१५ आणि बहुजन समाज पार्टीचे १४० पोस्टल मते पडली. इतर उर्वरित १३ उमेदवारांना पोस्टल मतदानामध्ये २० आकडा देखील गाठता आला नाही. तर नोटाला ७५ पोस्टल मते पडली. या १३ उमेदवारांपेक्षा पोस्टल मतांमध्ये  'नोटा' सरस ठरले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Maharashtraमहाराष्ट्र