कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव सुरस्कार होते. गोविंदराव पाटील, संतोष सुरस्कार, जगजीवन खंड़ारे, भास्कर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संत रविदास महाराज हे सर्व बहुजन चळवळ व संत परंपरेचे सुवर्ण कळस असून त्यांचे विचार आचरणात आणावे, असे मत भाऊराव सुरस्कार यांनी व्यक्त केले. गोविंदराव पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात रविदास महाराज यांच्या प्रतिमा पूजन, हार अर्पण करून दीप प्रज्वलनाने झाली. अंजली पाटील, दीपाली पाटील व निकिता पाटील या चिमुकल्यांनी स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी किन्ही वळगी येथील सरपंचपदी चर्मकार समाजाचे कार्यकर्ते संतोष सुरस्कार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन नरेंद्र विझे, प्रास्ताविक संदीप पाटील, तर आभार शिरीष मराठे यांनी मानले. कार्यक्रमाला समाज बांधव उपस्थित होते. यशस्वीतेसाठी उर्मिला पाटील, सुनीता पाटील, ताराबाई इंगळे, अनुराधा पाटील, गंगा पाटील, ज्योती पाटील, ममता पाटील, अंजली खंड़ारे, गौरव पाटील, वामनराव सुरस्कार, विशाल तान्डेकर, शाम इंगळे, राजेंद्र धामणे, अशोक पाचखंडे, डिगांबर पाटील, रमेश पाटील, प्रशांत सुरस्कार, रेणुदास इंगळे, किसना पाटील आदींनी परिश्रम घेतले.