पार्डी निंबी : पूसद तालुक्यातील पार्डी निंबी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गणेशपूर व सेवादासनगर येथे तांडा सुधार वस्ती योजनेतून विविध विकासकामे मंजूर झाली. त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
गणेशपूर व सेवादासनगर येथे प्रत्येकी दहा लाखांचे संत सेवालाल महाराज सामाजिक भवन, गणेशपूर येथे पाच लचंच सिमेंट रस्ता, पार्डी येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये १० लाखांचा सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला. या कामांचे भूमिपूजन आणि झालेल्या कामांचे लोकार्पण आमदार इंद्रनील नाईक याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेशपूरच्या नागरिकांसोबत त्यांनी चर्चा केली. यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने भुईमूग पिकाचे नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पार्डी, सेवादासनगर, गणेशपूर येथील पांदण रस्ते, पाणीपुरवठा, सिमेंट रोड, नाल्या, घरकूल आदी समस्यांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर, राजू पुरी, सरपंच मयूर राठोड, करण ढेकळे, देवीदास झरकर, ज्ञानेश्वर वाठ, अशोक गोरे, सुनील राठोड, मोहन पवार, बबन अलडवार, गणेश राठोड, उपसरपंच संगीता राठोड, ग्रामपंचायत सदस्य समाधान केवटे, राजू मोरे, बाबाराव अंभोरे, नवनाथ पवार, सचिव ए. बी. जाधव आदी उपस्थित होते. संचालन दारासिंग चव्हाण, तर आभार अरुण बरडे यांनी मानले.