यवतमाळ : निळोणा येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना संताजी मानव सेवा समितीतर्फे आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. उपेक्षित व वंचितांची सेवा आणि निराधारांना आधार, दु:खांवर पांघरूण घालण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या सेवा समितीने वृद्धांसोबत स्नेहभोजनाचा आनंदही घेतला. संताजी मानव सेवा समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, सचिव चंद्रशेखर मोहरकर यांनी यावेळी विचार मांडले. सामाजिक व कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार माता-पिता यांची वृद्धापकाळात केलेली सेवा मनुष्याचे जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी ठरेल असे मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळी वृद्धाश्रमाचे सचिव सुनील खातखेडकर, नारायणराव माकडे विद्यालय शाळा समितीचे अध्यक्ष राजेश चिंचोरे, ‘निमा’ संघटनेचे विभागीय सचिव डॉ. संजय अंबाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन व मार्गदर्शन विद्या चिंचोरे यांनी केले. यावेळी संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव देवीदास देऊळकर, संचालक एस.टी. गुल्हाने, महेश ढोले, सुरेश अजमिरे, नामदेवराव जयसिंगपुरे, डॉ. दीपक शिरभाते, जगदीश श्रीराव, बाळासाहेब गिरोळकर, अरुण कपिले, रमेश अगरवाल, किशोर गुल्हाने, उमेश कपिले, झोपाटे, उमेश अंबाडेकर, गणेश बुटके, नरेश ढाले, संतोष डोमाळे, अतुल पाटील, कार्तिक गिरोळकर, संताजी महिला मंडळाच्या विद्या चिंचोरे, कल्पना गुल्हाने, संजीवनी अंबाडेकर, शिल्पा पाटील, वंदना गिरोळकर, रत्नमाला डहाके, अंजली श्रीराव, जयश्री गुल्हाने, शुभांगी अंबाडेकर, विजया शिरभाते, अनुराधा गुल्हाने आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
संताजी मानव सेवा समितीने घातली मायेची पाखर
By admin | Published: February 09, 2017 12:27 AM