प्रा. मोरे यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रा.मोरे सरांचे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान’ या विषयावर अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत, समीक्षक प्रा. अशोक कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुनंदा बोदिले, प्रा.डॉ. अशोक इंगळे, प्रा.डॉ. भास्कर पाटील, प्रा.डॉ. अण्णा वैद्य, प्रा.डॉ. गजानन बनसोड, प्रा.डॉ. कैलास वानखडे, राजेश नाईक आदींनी विचार व्यक्त केले.
प्रा.डॉ. सीमा मोरे यांनी मोरे यांचा पँथर ते मेजरपर्यंतचा प्रवास सांगितला. अध्यक्ष प्रा.डॉ. अशोक कांबळे यांनी प्रा. सतेश्वर मोरे आंबेडकरी साहित्य प्रवाहाचे एक दिशादर्शक शिलेदार होते, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय शेजव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विक्रांत मेश्राम यांनी केले.
बॉक्स
अमरावती येथे अभिवादन
कार्यक्रमाच्या प्रारंभी अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रा.सतेश्वर मोरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. कीर्तीराज लोणारे यांनी बुद्ध वंदना घेतली. संगणक सहाय्यक म्हणून प्रा. पंकज भटकर, डॉ. नरेश बनसोड, प्रा. नंदेश चिंचोळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते, विचारवंत सहभागी झाले होते.