लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एमआयडीसीतील फिल्टर प्लाँटमधून टंचाई काळात तातडीने शुद्ध पाणी पुरविण्यासाठी ४० लाखाची पाईप लाईन टाकण्यात आली. लोहारा, सुयोगनगर, दर्डानगर टाकीतून पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही यवतमाळकर टीमने जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले.जीवन प्राधिकरणाने अडीच किलोमीटरची तातडीने पाईप लाईन टाकली. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाले. पालकमंत्री मदन येरावार यांनी या कामाचे लोकार्पण केल्यानंतरही आजतागायत पाईप लाईनमधून पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे या कामावर झालेल्या खर्चाची आणि तांत्रिक बाबीची तपासणी करण्यात यावी. निकृष्ट काम करणाऱ्या यंत्रणेकडून व कंत्राटदाराकडून खर्चाची रक्कम वसुल करावी. ३५ हजार लिटर्सचे १० टँकर लावले आहेत. पाईप लाईनच्या कामात अनियमितता झाल्याने प्रशासनाला टँकरवर अनाठाई खर्च करावा लागत आहे. टँकरमधून दुषित पाणी वितरीत केले जात आहे. त्यामुळे अनेकांना आरोग्य विषयक समस्या निर्माण झाली आहे. नीरी ने केलेल्या सर्वेक्षणानुसार उमरसरा भागात फ्लोराईडचे प्रमाण आढळले होते. प्रशासनाने शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अॅड. जयसिंह चव्हाण, अमित मिश्रा, चंद्रशेखर चौधरी, बबलू देशमुख, संजय ठाकरे, घनश्याम अत्रे, अफसर शहा, राजू जॉन, विजय बुंदेला आदी उपस्थित होते.
गोखीचे पाणी नळातून देण्यासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 9:54 PM
एमआयडीसीतील फिल्टर प्लाँटमधून टंचाई काळात तातडीने शुद्ध पाणी पुरविण्यासाठी ४० लाखाची पाईप लाईन टाकण्यात आली. लोहारा, सुयोगनगर, दर्डानगर टाकीतून पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही यवतमाळकर टीमने जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले.
ठळक मुद्देआम्ही यवतमाळकर : ४० लाखाच्या कामाची चौकशी करा