शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

ढाणकीच्या सविता तोटेवाड यांना सर्वाधिक मताधिक्य

By admin | Published: February 27, 2017 12:57 AM

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ढाणकी गटाच्या उमेदवार सविता सचिन तोटेवाड या जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या आहे.

 जिल्हा परिषद : ३१८९ मतांनी केली मात ढाणकी : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ढाणकी गटाच्या उमेदवार सविता सचिन तोटेवाड या जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर ३१८९ मतांची मात करीत विजय मिळविला आहे. ढाणकी जिल्हा परिषदेच्या गटात तिरंगी लढत झाली. सविता तोटेवाड या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार होत्या. त्यांनी भाजपाच्या उमेदवार शोभाताई गरुडे व शिवसेनेच्या उमेदवार प्रियंका कुसरे यांना पराभूत केले. सविता तोटेवाड यांना सात हजार ६४६ मते मिळाली. जिल्ह्यात सर्वाधिक मतांच्या फरकाने निवडून येण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. त्याच बरोबर ढाणकी गणात राष्ट्रवादीच्या कमल पराते व ब्राम्हणगाव गणात काँग्रेसचे नयन पुद्दलवार विजयी झाले आहे. संपूर्ण राज्यात शिवसेना, भाजपा घोंगावत असताना या गटाने व गणाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलासा दिला आहे. जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभूत व्हावे लागले. तर दुसरीकडे काही उमेदवारांचा निसटता विजय झाला. मात्र सविता तोटेवाड यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेण्याचा मान पटकाविला. (वार्ताहर)