लोकमत न्यूज नेटवर्कशिंदोला : वणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेत केवळ दोनच शिक्षक कार्यरत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या शाळेवर आणखी एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. त्यामुळे गुरूवारपासून विद्यार्थ्यांअभावी या शाळेत शुकशुकाट दिसून येत आहे.परमडोह येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत एक ते सातवीपर्यंत वर्ग भरतात. या शाळेची पटसंख्या ६६ आहे. पदविधर विषय शिक्षकाच्या नियुक्तीदरम्यान येथील प्रभारी मुख्याध्यापकाची बदली करण्यात आली. त्यामुळे गणित व विज्ञान विषय शिक्षकाचे पद येथे रिक्त होते. उर्वरित तीन शिक्षकांकडून अध्यापनाचे कार्य सुरू होते. मात्र २१ डिसेंबर २०१७ रोजी येथील सहाय्यक शिक्षक मनोहर पेलने हे प्रकृतीच्या कारणाने अचानक रजेवर गेले. त्यांची प्रकृती अद्यापही चांगली नसल्याने ते या सत्राच्या शेवटपर्यंत शाळेत रुजू होण्याची शक्यता नसल्याने पालक अस्वस्थ झाले आहेत. केवळ दोन शिक्षकांना अध्यापनाचे कार्य करणे कठिण झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने येथे १० पटसंख्येच्या आतील शाळेवरचा एक शिक्षक अध्यापनासाठी द्यावा, या मागणीसाठी ११ जानेवारीपासून विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकतला आहे. तसे निवेदनही वरिष्ठांना पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवीदास राजुरकर, उपसरपंच संदीप थेरे, सदस्य सतीश थेरे, प्रफुल्ल काकडे, गणेश केळझरकर, रविंद्र कोरांगे, पुरूषोत्तम वासेकर, महेंद्र वासेकर आदींच्या स्वाक्षºया आहेत.
परमडोह येथील विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 9:49 PM
वणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेत केवळ दोनच शिक्षक कार्यरत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या शाळेवर आणखी एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.
ठळक मुद्देदोनच शिक्षक : आणखी एक शिक्षक हवा, शाळा व्यवस्थापन समितीचे निवेदन