शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

शिक्षकांचीच भरली शाळा

By admin | Published: September 04, 2016 12:46 AM

येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शनिवारी चक्क शिक्षकांचीच शाळा भरल्याचे चित्र दिसून आले.

शिक्षणाधिकारी कार्यालय : समायोजनात १२४ शिक्षकांना मिळाली नियुक्तीयवतमाळ : येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शनिवारी चक्क शिक्षकांचीच शाळा भरल्याचे चित्र दिसून आले. समायोजनासाठी अतिरिक्त शिक्षकांसह मुख्याध्यापकांनाही पाचारण करण्यात आल्याने अक्षरश: जत्राच भरली होती.जिल्ह्यात संचमान्यतेनुसार १२४ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया आत्तापर्यंत रखडली होती. अनेकदा समयोजनासाठी अतिरिक्त शिक्षकांना पाचारण करण्याबाबतचे संदेश सतत फिरत होते. मात्र प्रत्येकदा ऐनवेळी समायोजनाच्या तारखेत बदल होत होता. यामुळे अतिरिक्त शिक्षक अक्षरश: भंडावून गेले होते. सुरुवातीला २० आॅगस्टपर्यंत अतिरिक्त शिक्षक व रिक्त जागांची यादी अपडेट झाल्याने २४ व २५ आॅगस्टला समायोजन करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले होते.या महितीने अतिरिक्त शिक्षकांचा जीव भांड्यात पडला होता. मात्र ऐनवेळी तांत्रिक कारण पुढे करून हे समायोजन रद्द करण्यात आले होते. त्यानंतर शिक्षक व शिक्षण संस्थांना यादीवर सूचना व हरकती घेण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार १२ शिक्षकांनी यादीवर आक्षेप घेतले. त्यांच्या आक्षेपानुसार पुन्हा यादी तयार करण्यात आली. नंतर ३० व ३१ आॅगस्टला समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिरिक्त शिक्षक व संबंधित मुख्याध्यापकांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. या सर्व प्रकारानंतर पुन्हा एकदा समायोजन रद्द करण्यात आल्याचा संदेश संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांना पाठविण्यात आला. अखेर शनिवारी, ३ सप्टेंबरला समायोजनाची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी अतिरिक्त शिक्षक व मुख्याध्यापकांना पाचारण करण्यात आले. परिणामी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयालाच चक्क शाळेचे रूप प्राप्त झाले होते. या कार्यालयाच्या परिसरात सर्वत्र वाहनांची गर्दी झाली होती. प्रांगणात पेन्डॉलही टाकण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी)