लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अहेबाब एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्रियदर्शिनी उर्दू गर्ल्स हायस्कूल चालविण्यात येते. या हायस्कूलच्या मुख्याध्यापक कक्षाला सचिवांनी कुलूप लावले. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा अडचणीत आली आहे. यामुळे विद्यार्थिनींनी गुरूवारी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.प्रियदर्शिनी हायस्कूलचे सचिव हफीक शेख यांनी मुख्याध्यापक कक्षाला कुलूप लावले. या कक्षात शिक्षकांचे दैनंदिन रजिष्टर आणि प्रात्यक्षकाचे साहित्य आहे. यासंदर्भात मुख्याध्यापकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदविली होती. यानंतरही कुलूप उघडले गेले नाही. गुरूवारी प्रात्यक्षिक परीक्षा होती. यानंतरही कुलूप उघडले गेले नाही.यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी एसपी कार्यालयात धडक दिली. कक्षाचे कुलूप तोडून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची मागणी केली.
परीक्षेच्या दिवशी शाळेला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:05 PM
अहेबाब एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्रियदर्शिनी उर्दू गर्ल्स हायस्कूल चालविण्यात येते. या हायस्कूलच्या मुख्याध्यापक कक्षाला सचिवांनी कुलूप लावले. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा अडचणीत आली आहे.
ठळक मुद्देउर्दू हायस्कूल : विद्यार्थिनी धडकल्या एसपी कार्यालयावर