लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील खंडाळा शाळेवर शिक्षक मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. शिक्षक देणार, अशी हमी पंचायत समिती सभापतींनी दिली. मात्र शिक्षण विभागाकडून याची पूर्तता झाली नाही. अखेर पंचायत समिती सभापती मनीषा गोळे यांनी बुधवारी स्वत: शाळा उघडून अध्यापनाचे काम केले.जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे कुठलेच नियोजन नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागत आहे. खंडाळा ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समितीत शाळा भरविली होती. आश्वासनानंतरही दोन महिन्यांपासून शाळेला शिक्षकच नाही. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आजंती व सिंदखेड शाळेतील दोन शिक्षकांना खंडाळ्यात नियुक्ती दिली. मात्र हे शिक्षक अद्याप रुजू झाले नाही. त्यामुळे २७ जानेवारीला खंडाळ्याची शाळा पंचायत समितीत भरली. त्यावर सभापती मनीषा गोळे यांनी ५ फेब्रुवारीपर्यंत पूर्णवेळ शिक्षक देण्याचे आश्वासन विद्यार्थी व ग्रामस्थांना दिले. त्यासाठी गोळे यांनी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र ५ तारखेला शिक्षक न मिळाल्याने स्वत: सभापतींनी शाळा उघडून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम केले.नियमित शिक्षक येईपर्यंत रोज अध्यापनाचे काम करणार. शिक्षण विभागाच्या कारभाराला जनता कंटाळली आहे.- मनीषा गोळे, सभापती,पंचायत समिती, नेर
सभापतींनीच उघडली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:02 AM
तालुक्यातील खंडाळा शाळेवर शिक्षक मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. शिक्षक देणार, अशी हमी पंचायत समिती सभापतींनी दिली. मात्र शिक्षण विभागाकडून याची पूर्तता झाली नाही. अखेर पंचायत समिती सभापती मनीषा गोळे यांनी बुधवारी स्वत: शाळा उघडून अध्यापनाचे काम केले.
ठळक मुद्देनेर पंचायत समिती : शिक्षक नसल्याने बंद होती खंडाळाची शाळा