अविनाश साबापुरे
यवतमाळ : वर्षभर प्रचंड मेहनत घेऊन हजारो मुले शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाली. मेरीट लिस्टमध्येही आली. परंतु या गुणवंतांची त्यांच्याच शाळांना अजिबात कदर नसल्याने त्यांचा बँक खाते क्रमांक परीक्षा परिषदेला कळविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे राज्यातील २२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे.
२०२२ च्या जुलै महिन्यात ही परीक्षा पार पडली. तर यंदा ३ जानेवारीला निकाल जाहीर झाला. त्यात २९ हजार १७१ विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले. शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी त्यांचे बँक खाते क्रमांक परीक्षा परिषदेला कळविणे आवश्यक आहे. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही २९ केवळ सात हजार विद्यार्थ्यांचे खाते परिषदेला कळविण्यात आले.
इयत्ता ८ वीचे वंचित विद्यार्थी
रायगड २४८ ठाणे ३६१ पालघर १२९ पुणे ७३६अहमदनगर ४५२सोलापूर ४८० नाशिक ५८७धुळे २२८ जळगाव २९२ नंदुरबार १६१ कोल्हापूर ३७३सातारा ३५१सांगली ३०८ रत्नागिरी १८४ सिंधुदुर्ग १०५ औरंगाबाद ३७५ जालना १७० बीड २८६परभणी १३७ हिंगोली १०० अमरावती १८५ बुलडाणा २७१ अकोला १८७ वाशिम १२१ यवतमाळ १९५ नागपूर २८२ भंडारा १३४गोंदिया १५४ वर्धा ६१चंद्रपूर ११३ गडचिरोली ११लातूर ३११उस्मानाबाद १९३नांदेड ३१९ मुंबई ९१५
इयत्ता ५ वीचे वंचित विद्यार्थी
रायगड २७९ ठाणे ५०२पालघर २३८पुणे ८४२ अहमदनगर ५८८सोलापूर ५३७नाशिक ५९७धुळे २२१जळगाव ४४५ नंदुरबार १८३कोल्हापूर ४३८सातारा ३५८ सांगली ३५३ रत्नागिरी १७४ सिंधुदुर्ग ९३औरंगाबाद ४०३ जालना २१४ बीड ३३९ परभणी १८९ हिंगोली १३९अमरावती ४६० बुलडाणा ३३७ अकोला २७० वाशिम १९१ यवतमाळ ३७७नागपूर ६९६भंडारा १७५ गोंदिया १९२ वर्धा १६१ चंद्रपूर ३१९ गडचिरोली १३०लातूर ३३५ उस्मानाबाद २१८ नांदेड ३९० मुंबई १२५०