राज्य परिवहन महामंडळाच्या पुसद आगारातील अध्र्या अधिक भंगार बसेस सर्रासपणे रस्त्यावर धावत आहेत. यापैकी अनेक बसेसला मोल्ड केलेले टायर बसविण्यात आले असून अनेक बसेसमधील आसने गायब आहेत. या भंगार अवस्थेतील बसेस ग्रामीण भागासह लांब पल्ल्यासाठीही वापरण्यात येतात. बसेसच्या दुर्दशेमुळे हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशाना इच्छित स्थळी नेण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. पुसद आगारातून ग्रामीण विभागासह अनेक लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्यात येतात. सुरक्षित आणि सुखाचा प्रवास असल्यामुळे हजारो प्रवासी दररोज एसटी बसने प्रवास करतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून या आगारातील अनेक बसेस भंगार झाल्या आहे. अनेक बसेस निकामी झाल्या आहेत. परंतु या बसेसला भंगारात न टाकता त्यामधून सर्रास प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. तर अनेक बसेसमधील आसने गायब झाली आहेत. नादुरुस्त इंजिन, खिळखिळ्या झालेल्या खिडक्यामुळे या बसेस सतत आवाज करीत असतात. सध्या उन्हाळा असल्यामुळे आणि बसेसला मोल्ड टायर बसविण्यात आल्यामुळे अनेक बसेसच्या पंरचे प्रमाण वाढले आहे. बस पंर झाली म्हणजे प्रवाशांना हमखास घरी पोहोचण्यास एक ते दीड तास उशीर होतो. रबरी सीट नसल्यामुळे अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. ‘
भंगार बसेस रस्त्यावर
By admin | Published: June 02, 2014 1:50 AM