शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
3
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
4
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
5
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
6
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
7
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
8
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
9
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
10
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
11
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
12
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
13
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
14
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
15
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
16
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
17
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
18
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
19
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
20
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

शाळेजवळील पानठेले सील करा

By admin | Published: June 04, 2016 2:16 AM

शाळेतील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन जडू नये म्हणून शाळेजवळील पानठेले सील करावे, त्यासाठी मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा,

जिल्हाधिकारी : जिल्हा परिषद परिसरात तंबाखूविरोधी भित्तीचित्र स्पर्धेचा अनावरण सोहळा यवतमाळ : शाळेतील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन जडू नये म्हणून शाळेजवळील पानठेले सील करावे, त्यासाठी मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, शाळेच्या परिपाठात तंबाखूविरोधी संदेश आणि शपथ देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केल्या. जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हा परिषद, सलाम मुंबई फाऊंडेशनतर्फे भित्तीचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या चित्रांच्या अनावरण सोहळ्यात जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, सीईओ दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, मुख्याधिकारी सुदाम धुपे, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद इमारत, लक्ष्मणराव कळसपुरकर, आयुर्वेदिक महाविद्यालय आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरपरिषद आयुर्वेदिक रुग्णालय पाटीपुरा याठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी चित्रे रेखाटली. स्पर्धक विद्यार्थी आणि कला अध्यापक संघ यांना सहभाग घेतल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटनांनी एकत्र येऊन जिल्हा तंबाखूमुक्त करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी केले. २१ व्या शतकातील मुलांनी चाणाक्षपणे निर्णय घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी केले. महिला सरपंच, जिल्हा परिषद सदस्य यांच्यामध्ये तंबाखूविरोधी जनआंदोलन पोहोचविण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंबाखूमुक्त शाळा उपक्रमाचे जिल्हा समन्वयक चंद्रबोधी घायवटे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. चेतन दरणे यांनी केले. सलाम मुंबई फाऊंडेशनचे अजय पिळणकर यांनी आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)