शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

ऊर्जा राज्यमंत्र्यांशी ‘एसईए’ची चर्चा

By admin | Published: January 08, 2017 1:01 AM

महावितरणचे मोहोळ (जि. सोलापूर) येथील उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून

आंदोलनाची दखल : लवकरच कारवाईची दिली ग्वाही यवतमाळ : महावितरणचे मोहोळ (जि. सोलापूर) येथील उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्र्यांनी शुक्रवारी धरणे मंडपाला भेट देत लगेच कारवाईची ग्वाही दिली. यापूर्वी महावितरणच्या विविध विभागात प्रशासनाच्या जाचाला कंटाळून काहींनी आत्महत्या केल्याचे संघटनेने म्हटले आहे. पानसरे यांच्या आत्महत्येस कारणीभूत सोलापूरचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता (ग्रामीण) यांना तत्काळ निलंबित करावे, तिनही कंपनीतील वर्क नॉर्म्स ठरवावे, अभियंत्यांचे कामाचे तास निश्चित करावे, कर्मचाऱ्यांना लोकसेवकाचा दर्जा द्यावा, प्रशासनाकडून अभियंत्यांवर होणारी एकतर्फी कारवाई थांबवावी, आदी मागण्यांसाठी संघटनेने यवतमाळात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी शुक्रवारी ‘एसईए’च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी संघटनेच्या मागण्या जाणून घेतल्या. ना. फेरावार यांनी तत्काळ मुंबईतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मागण्यांबाबत त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिले. अभियंत्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सध्याच्या प्रणालीत सुधारणा करण्याची ग्वाहीसुद्धा ना. येरावार यांनी दिली. भविष्यात अभियंत्यांवर असे प्रसंग येणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी संघटनेचे सहसचिव विवेक राऊत, सर्कल सचिव प्रकाश कोळसे, विलास चेले, सुहास मेश्राम, अमोल मिरकुटे, आकाश जयसिंगपुरे, संजय राठोड आदींसह महावितरण व महापारेषणमधील अभियंते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)