सरपंच किशोर पंजाबराव बिहाडे यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून, मास्कचा वापर करून शेतकऱ्यांची गर्दी न करता प्रात्यक्षिक करण्यात आले. मधुकर सूर्यभान ताजने यांच्या घरचे बियाणे घेऊन बियाणे उगवण क्षमता चाचणी पार पडली. एम. पी. मेंडके यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. सरपंच किशोर बिहाडे यांनी खरीपपूर्व नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. सोयाबीन बियाणे बीज प्रक्रिया करून पेरणी करावी, असे आवाहन केले.
जमिनीची सुपीकता, निर्देशांकानुसार खताची मात्रा शेतकऱ्यांनी पिकांना द्यावी, याबाबतही मर्गदर्शन करण्यात आले. तूर, उडीद, मूग, आदी पिकांचा पेरा वाढवावा, याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. सोयाबीन पिकाची पेरणी सरी, वरंबा पद्धतीने करण्याचे महत्त्व व फायदे शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. जास्तीत जास्त सरी, वरंबा पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन केले. मग्रारोहयोअंतर्गत फळबाग योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. खते व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, यावरही माहिती देण्यात आली.