दारव्हा : येथे शिवसेना, युवासेनेच्यावतीने युवासेना प्रमुख पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी कुरसिंगे, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज सिंगी, शहरप्रमुख राजू दुधे, चेतन करोडदेव, यशवंत पवार, नगरपरिषद सभापती गजेंद्र चव्हाण, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुशांत इंगोले, तालुकाप्रमुख प्रवीण भगत, शहरप्रमुख तुषार कांबळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अजय गाडगे, प्रमोद यंगड, गणेश पुसदकर, बंडू कान्हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात गिलोय रस, च्यवनप्राश, शहद, सॅनिटायझर आदी साहित्य असलेल्या कीटचे वाटप रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले. सततची नापिकी, कोरोनाच्या संकटामुळे शेती व्यवसायावर परिणाम झाल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यात बियाणे, खतांच्या वाढत्या भावामुळे पेरणी कशी करावी, या विवंचनेत ते आहेत. अशा शेतकऱ्यांना थोडा आधार देता यावा, यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना बियाणे वाटप करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. संचालन धनराज राठोड यांनी केले, तर आभार अजय गाडगे यांनी मानले.