शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

बोअरवेल खोदताना मशीन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 11:22 PM

टंचाई क्षेत्र घोषित यवतमाळ शहरात बंदी असताना बोअरवलचे खोदकाम करताना मंगळवारी मशीनचे दोन ट्रक जप्त करण्यात आले.

ठळक मुद्देपाणी प्रश्न : यवतमाळ शहरात एसडीओंची पहिली कारवाई

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : टंचाई क्षेत्र घोषित यवतमाळ शहरात बंदी असताना बोअरवलचे खोदकाम करताना मंगळवारी मशीनचे दोन ट्रक जप्त करण्यात आले. ही कारवाई समर्थवाडीतील ‘आरोग्यम हॉस्पिटल’मध्ये उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी पथकासह धाड टाकून केली. ही यवतमाळ शहरातील पहिलीच कारवाई असून यामुळे बोअरवेल खोदणाºयांचे धाबे दणाणले आहे.दुष्काळी क्षेत्रात भूजल वापराबाबत नियमन करण्यात आले आहेत. पाण्याचा व्यवसायिक वापर पूर्णत: बंद करण्याचे निर्देश आहेत. पाण्याची टंचाई असल्याने भूजल पातळी कायम राहावी यासाठी नवीन बोअरवेल, विहिरी खोदकामावर बंदी आहे. असे असतानासुध्दा येथील ज्योती मंगल कार्यालयासमोरील ‘आरोग्यम हॉस्पिटल’मध्ये बोअरवेल खोदकाम सुरू होते. याची तक्रार भूजल विभागाकडे करण्यात आली. या तक्रारीची माहिती उपविभागीय दंडाधिकारी स्वप्नील तांगडे यांना देण्यात आली. तांगडे यांनी तहसलीदार सचिन शेजाळ यांना घेऊन या ठिकाणी धाड टाकली. भूजल अधिनियमातील कलम २५ नुसार ही मशीन जप्त करण्यात आली. कर्नाटक येथील मशीन असलेले दोन ट्रक तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे. भूजल अधिनियमातील तरतुदीनुसार या दोन्ही ट्रकवर कारवाई केली जाणार आहे. शहरातील ही पहिलीच कारवाई असून यापुढे बोअरवेल खोदकामावर पूर्णत: बंदी असल्याचे एसडीओ तांगडे यांनी सांगितले.