ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना गुजरात पॅटर्नचा धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 09:20 PM2018-07-05T21:20:32+5:302018-07-05T21:22:00+5:30

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट वाटपात गुजरात पॅटर्नची अंमलबजावणी केली जाण्याची चिन्हे आहेत. त्याची झलक मंगळवारी विधान परिषदेच्या तिकीट वाटपात दिसून आली. त्यामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी या पॅटर्नचा धसका घेतला आहे.

Senior Congress leaders suffer from the pattern of Gujarat | ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना गुजरात पॅटर्नचा धसका

ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना गुजरात पॅटर्नचा धसका

googlenewsNext
ठळक मुद्देतरुण व नव्या चेहऱ्यांचा शोध : पराभूतांना पुन्हा उमेदवारी नाही

राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट वाटपात गुजरात पॅटर्नची अंमलबजावणी केली जाण्याची चिन्हे आहेत. त्याची झलक मंगळवारी विधान परिषदेच्या तिकीट वाटपात दिसून आली. त्यामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी या पॅटर्नचा धसका घेतला आहे.
गुजरातमध्ये काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत परंपरागत चेहऱ्यांना बेधडकपणे बाजूला सारत तरुण व नवीन चेहºयांना संधी दिली. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. पंतप्रधानांचा बालेकिल्ला असूनही गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपाच्या बरोबरीने जागा मिळविल्या. त्यामुळे उत्साह वाढलेल्या दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनी आता हाच पॅटर्न आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देशभर राबविण्याचे धोरण ठरविल्याची काँग्रेसच्या गोटातील माहिती आहे. मंगळवारी विधान परिषदेसाठी तिकीट वाटप करताना येथील डॉ. वजाहत मिर्झा यांना अनपेक्षितपणे तरुण व नवा चेहरा म्हणून काँग्रेसने संधी दिली. त्यामुळे गुजरात पॅटर्नवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
या पॅटर्नची हूरहूर जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांमध्ये आधीपासूनच पहायला मिळते. त्यामुळे वर्षानुवर्षे विधानसभा लढविणाºया या नेत्यांनी लोकसभेच्या दृष्टीनेही चाचपणी चालविली आहे. विधान परिषदेच्या तिकीट वाटपानंतर तर या नेत्यांनी जणू विधानसभेचा मार्ग सोडून लोकसभेचाच मार्ग निवडण्याचे निश्चित केले आहे. सुमारे ४० वर्र्षांपासून केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे राजकारण सांभाळणाऱ्या माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार केल्याचे सांगण्यात येते. कारण वाढत्या वयामुळे विधानसभेत संधी मिळण्याची फारशी शक्यता नसल्याची जाणीव झाल्यानेच त्यांनी लोकसभेची तयारी चालविली आहे. दोन दशकापासून वणी विधानसभा मतदारसंघ सांभाळणाऱ्या काँग्रेसच्या वामनराव कासावारांनीही चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघाबाबत चाचपणी चालविली आहे. या अनुषंगाने त्यांची अलिकडेच मतदारसंघातील एका लोकनेत्याशी आदिलाबाद येथे बैठकही झाली.
माजी आमदार वसंत पुरके, विजय खडसे हे ज्येष्ठांच्या यादीत नसले तरी ‘पराभूतांना पुन्हा उमेदवारी नाही’ या काँग्रेसच्या नव्या धोरणाचा त्यांना उमेदवारीत फटका बसू शकतो. राळेगाव मतदारसंघात तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून तसाही उघडपणे पुरकेंच्या नावाला विरोध होतो आहे. यावेळी ‘उमेदवार बदलवून दिला तरच आम्ही काँग्रेस सोबत’ अशी रोखठोक भूमिका काँग्रेसच्या या पदाधिकाºयांनी घेतल्याचे सांगितले जाते. पर्याय म्हणून तीन नवे चेहरे तयारही ठेवण्यात आले आहे. संधी मिळेल तेव्हा त्यांना प्रोजेक्ट केले जात आहे.
माणिकरावांना लोकसभेतही रोखण्याचे प्रयत्न
उपसभापतीपद असतानाही माणिकराव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी काँग्रेसने नाकारली. मोहन प्रकाश महाराष्ट्र प्रभारी असताना प्रतिप्रदेशाध्यक्षाची भूमिका वठविणे माणिकरावांसाठी अडचणीचे ठरले. शिवाय भविष्यात राज्यात सरकार आल्यास ‘टॉप फाईव्ह’मध्ये त्यांचे नाव राहू नये म्हणून एरव्ही विरोधात राहणाऱ्या दोन चव्हाणांनी यावेळी एकजुटीने माणिकरावांचा गेम केल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जाते. विधान परिषदेचे तिकीट नाकारताना माणिकरावांना यवतमाळ-वाशिममध्ये लोकसभेच्या तयारीला लागा, असे सांगण्यात आल्याचे बोलले जाते. परंतु आता अचानक अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जीवन पाटील सक्रिय झाले आहे. साहेबच लोकसभा लढविणार असे मोघे समर्थकांकडून सांगितले जात आहे. या माध्यमातून माणिकरावांना लोकसभेचीही उमेदवारी मिळू न देणे हा त्यांच्या विरोधी गटाचा मनसुबा दिसतो. राज्यात सर्वात कमी मतांनी पराभूत, अवघ्या दहा दिवसांच्या तयारीत आणि मोदी लाटेतही तीन लाखांवर घेतलेली मते, मतदारसंघात समाजाचे प्राबल्य या मोघेंच्या जमेच्या बाजू असल्या तरी ‘पराभूतांना उमेदवारी नाही’ हे धोरण आडवे आल्यास त्यांच्याऐवजी माणिकरावांना संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोघेंनी लोकसभेची उमेदवारी मिळविल्यास माणिकरावांना दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघाशिवाय पर्याय राहणार नाही, असे दिसते.

Web Title: Senior Congress leaders suffer from the pattern of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.