अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्यात दोन महिलांसह सात जण सोमवारी दुपारी अडकले. एका खडकाच्या आश्रयाने तब्बल तीन तास मृत्यूशी झुंझ दिली. पोलीस आणि नागरिकांच्या प्रयत्नाने सातही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. वेळ आली होती परंतु दैव बलवत्तर म्हणून सर्वांचे प्राण वाचले. या थरारक घटनेने उपस्थित पर्यटकांच्या अंगावरही काटा आला होता.विदर्भ, मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. या धबधब्याच्या वरच्या बाजुला यंदा पाणी कमी असल्याने अनेकांची ये-जा सुरू असते. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मराठवाड्याच्या इसलापूर भागातून सात जण नदी पार करीत होते. परंतु त्याच वेळेस अचानक मुरली बंधाºयाचे पाणी सोडले. पाण्याची पातळी वाढली. हा प्रकार लक्षात येताच दोन महिलांसह सातही जणांनी एका मोठ्या खडकाचा आधार घेतला. मागच्या बाजुला धो-धो करत प्रचंड आवाजाचा धबधबा आणि समोरून पैनगंगेचे वाढते पाणी. अशा परिस्थितीत हे सातही जण अडकले. आता मृत्यू अटळ आहे, असे त्यांना वाटू लागले. हा प्रकार दोन्ही बाजुचे पर्यटक पाहात होते. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर काही युवकांनी थेट मुरलीचा बंधारा गाठला. बंधाºयाचे गेट बंद केले. या सात जणांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. एका दोरीच्या सहाय्याने सातही जणांना एका पाठोपाठ एक तब्बल तीन तासांच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आले. कांताबाई नामदेव चव्हाण (५०), तोतीबाई राठोड (४०) दोघीही रा. बोधडी ता. किनवट, रवी राम राठोड (३०) रा. चिंचोली ता. उमरखेड, संदीप ग्यानबा नरवाडे रा. महागाव, गोपी जाधव (३५) रा. मुरली ता. उमरखेड, जनार्दन गायकवाड (३०) रा. धानोरा ता. किनवट, श्यामराव राठोड (७०) रा. राजगड ता. किनवट यांचा समावेश होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी बिटरगावचे ठाणेदार रंगनाथ जगताप, उपनिरीक्षक रमेश खंदारे, विक्रम बोने यांच्यासह स्थानिक तरुण नितीन जाधव, अरविंद चव्हाण, अनिल राठोड, नामदेव राठोड, तुकाराम राठोड, हनुमान जयस्वाल, वसंता राठोड यांनी सहकार्य केले.मृत्यूच्या दारातून परतलेसहस्त्रकुंड धबधब्याचा प्रचंड आवाज येतो. या धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या खडावरच हे सात जण अडकले होते. उघड्या डोळ््यांनी मृत्यू दिसत होता. त्यातच पैनगंगेचे पाणीही वाढत होते. परंतु दैव बलवत्तर म्हणून वेळीच मदत मिळाली आणि सातही जण मृत्यूच्या दाढेतून परत आले.
सहस्त्रकुंड धबधब्यात अडकले दोन महिलांसह सात जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:56 PM
विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्यात दोन महिलांसह सात जण सोमवारी दुपारी अडकले. एका खडकाच्या आश्रयाने तब्बल तीन तास मृत्यूशी झुंझ दिली.
ठळक मुद्देतीन तास अनुभवला थरार : पोलीस आणि नागरिकांनी काढले सुखरूप बाहेर, मुरली बंधाºयाचे पाणी सोडल्याचा परिणाम