शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

स्वस्त धान्य दुकानात साडेसात हजार पॉस मशीन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 3:02 PM

गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे.

ठळक मुद्देयोग्य लाभार्थीस अन्नधान्य मिळण्यास मदतयवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक मशीन्सचा वापरअमरावती विभागातील सर्वच दुकानात मशीन्स

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे. यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये आॅनलाईन पद्धतीने धान्य वितरित करण्यासाठी सात हजार ३४३ पॉस (पीओएस - पॉर्इंट आॅफ सेल) मशिन्स बसविण्यात आली आहे. धान्य खरेदी करणाºया ग्राहकांचे बायोमेट्रिक खात्री करूनच त्याला धान्य वितरित करण्यात येणार आहे. यामुळे धान्य वितरणातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.अमरावती विभागात सर्वाधिक पॉस मशिन्स यवतमाळ जिल्ह्यात बसविण्यात आल्या आहेत. यवतमाळ तालुक्यात २ हजार ६९ मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. पुसद तालुक्यात सर्वाधिक २०० तर यवतमाळमध्ये १९३ मशीन्स बसविण्यात आले आहेत. झरीजामणी या आदिवासी बहुल तालुक्यात १०२ मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात १ हजार ९१२ मशीन बसविण्यात आल्या आहेत. सर्वाधिक १६५ मशीन्स अचलपूर तालुक्यात बसविण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या दुर्गम भागातही मशीन्स बसविण्यात आल्या आहे. यात धारणी तालुक्यात १६१ तर चिखलदरा तालुक्यात १५२ मशीन्स कार्यरत आहेत.बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ५२४ मशिन्स बसविण्यात आल्या आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक १७४ तर त्यापाठोपाठ चिखली तालुक्यात १७१ मशिन्स बसविण्यात आल्या आहे. अकोला जिल्ह्यात एक हजार ६० मशिन्स बसविण्यात आल्या आहेत. यात ३०१ मशिन्स अकोला तालुक्यात आहे. अकोटमध्ये १६४ तर मुर्तीजापूर तालुक्यात १६३ मशिन्स बसविण्यात आल्या आहे. वाशिम जिल्ह्यात ७७८ मशिन्स असून कारंजा तालुक्यात १४७ तर वाशिम तालुक्यात १४५ मशिन्स आहेत.अशी होते यंत्रणा कार्यान्वितलाभार्थी धान्य घेण्यासाठी रास्त भाव दुकानात आल्यानंतर त्याला अंगठा मशीनवर ठेऊन खात्री करावी लागेल. त्यानंतर लाभार्थीचा त्वरित संपूर्ण डाटा दिसून येईल. त्याला द्यायचे धान्य, त्याची रक्कम याबाबतच्या संपूर्ण तपशिलाची पावतीच मशीनमधून बाहेर पडेल. त्या पावतीच्या आधारे रास्त भाव धान्य दुकानदार धान्य देईल. अश पद्धतीने ई-पीडीएस व्यवहार होत असल्याने वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत मिळत आहे.‘अनुदानातून बाहेर पडा’ योजनाशिधापत्रिकेवरील धान्य काही लाभार्थी घेत नाहीत. तेच धान्य गरजू लोकांना मिळावे, यासाठी ‘गिव्ह इट अप’ ही योजना सुरू केली आहे त्याला ‘अनुदानातून बाहेर पडा’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यांना रेशनचे धान्य नको आहे त्यांना आपले धान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय या योजनेत दिला आहे. त्यातून बचत होणारे धान्य गरजूंना देण्यात येणार आहे.