लोकमत न्यूज नेटवर्कसवना : कुशाग्र बुद्धीच्या आणि एमडीचे शिक्षण घेणाऱ्यां महागाव तालुक्यातील सवना येथील तरुणीने मुंबईत गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रशियात शिक्षण घेणाºया आपल्या भावाशी तिने संवादही साधला होता. कोणताही तनाव नसताना आत्महत्या केल्याने रशियातील भावासह संपूर्ण परिवारही हादरला आहे. या घटनेने महागाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.डॉ.विद्या विठ्ठलराव करोडकर (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती येथील विठ्ठलराव करोडकर यांची मुलगी होती. करोडकर यांना विद्या व वीणा या दोन मुली तर उदय व उत्कर्ष ही दोन मुले आहे. विद्या मुंबई येथे शिव सेठ र.व. आयुर्वेदिक रुग्णालयात एमडी प्रथम वर्षाला शिकत होती. विद्याने पुसद येथून बीएएमएस पूर्ण केले होते. त्यानंतर पुण्याच्या टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयात इंटरनशीप केली. ती मुंबई येथील रुग्णालय परिसरातील वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. २५ डिसेंबरच्या रात्री तिने परिवारातील सर्वांसोबत मोबाईलने संवाद साधला. रात्री १ ते २ वाजताच्या दरम्यान रशियात शिक्षण घेणारा भाऊ उदय याच्यासोबतही संवाद साधला. त्यावेळी ती कोणत्याही तनावात दिसत नव्हती असे उदय सांगतो. यानंतर काही वेळातच विद्याने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. आत्महत्येपूर्वी तिने वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहिली असून मी जीवन संपवित आहे. भावंडांचे शिक्षण पूर्ण करावे, असे या चिठ्ठीत लिहिले आहे.प्रस्तूत प्रतिनिधीने वडील विठ्ठलराव करोडकर यांच्याशी संपर्क साधला असता माजी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. हा घातपाताचाच संशय असावा, असे त्यांनी सांगितले.
आत्महत्येपूर्वी विद्याने साधला होता रशियातील भावाशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:26 PM
कुशाग्र बुद्धीच्या आणि एमडीचे शिक्षण घेणाऱ्यां महागाव तालुक्यातील सवना येथील तरुणीने मुंबईत गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रशियात शिक्षण घेणाºया आपल्या भावाशी तिने संवादही साधला होता.
ठळक मुद्देसवना येथील डॉक्टर तरुणी : महागाव तालुका हळहळला